श्री जय भवानी माता पॅनल च्या उमेदवारांच्या प्रचारार्थ उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सभेचे कुरवली येथे आयोजन.
उपस्थित राहण्याचे उमेदवार घोलप व कदम यांचे मतदारांना आवाहन.

विजय शिंदे
श्री छत्रपती सहकारी साखर कारखाना भवानीनगर पंचवार्षिक संचालक मंडळ निवडणुकीसाठी प्रचार अंतिम टप्प्यात आला असून श्री जय भवानी माता पॅनल च्या उमेदवारांच्या प्रचारार्थ महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सभेचे कुरवली( ता. इंदापूर ) येथे आयोजन करण्यात आले आहे.
ग्रामपंचायत कुरवली येथील जय हनुमान मंदिर येथे गुरुवार दिनांक १५ रोजी सायंकाळी पाच वाजता उपमुख्यमंत्री अजित पवार मतदार सभासदांना मार्गदर्शन करणार आहेत.
यावेळी राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री दत्तात्रय भरणे महाराष्ट्र राज्य साखर संघाचे माजी अध्यक्ष पृथ्वीराज जाचक उपस्थित राहणार आहेत. गट नंबर तीन उद्धट या कार्यक्षेत्रातील सर्व गावातील सर्व सभासद मतदार बंधू भगिनी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन उमेदवार पृथ्वीराज घोलप व गणपत कदम यांनी केले आहे.



