Uncategorized

इंदापूर नगर परिषदेच्या कामगारांचा मोठा आर्थिक प्रश्न सुटला.!

विजय शिंदे

इंदापूर नगरपरिषदेच्या वतीने कामगारांच्या हितासाठी मोठा निर्णय घेण्यात आला असून, नगराध्यक्ष भरत (शेठ) शहा यांच्या नेतृत्वाखाली एकूण ₹१,५७,५४,८४० इतकी रक्कम कामगारांना वितरित करण्यात आली आहे. या निर्णयामुळे अनेक कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित आर्थिक बाबींना न्याय मिळाला असून कामगारांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.

यामध्ये इंदापूर नगरपरिषदेतील नियमित करण्यात आलेल्या ४१ कर्मचाऱ्यांना वेतन फरकाची ₹८०,९३,८३३ इतकी रक्कम देण्यात आली. तसेच सेवानिवृत्त ८ कर्मचाऱ्यांना उपदान (Gratuity) व रजा रोखीकरणाच्या स्वरूपात ₹६४,०६,३५० देण्यात आले. याशिवाय सेवानिवृत्त २९ कर्मचाऱ्यांना (१०/२०/३० फरक) अंतर्गत ₹१२,४९,६५७ इतकी रक्कम वितरित करण्यात आली. अशा प्रकारे एकूण ₹१.५७ कोटींचा निधी कामगारांच्या खात्यात जमा करण्यात आला.

या वितरण कार्यक्रमाला मुख्याधिकारी रमेश ढगे तसेच सर्व नगरसेवक उपस्थित होते. कार्यक्रमावेळी कामगारांनी आपल्या भावना व्यक्त करत नगराध्यक्ष भरतशेठ शहा यांचे आभार मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button