Uncategorized

सुनील माळी हे विद्यार्थी “प्रिय” आदर युक्त शिक्षक.

विजय शिंदे

समाजात चांगली पिढी घडविण्याचे पवित्र काम शिक्षकांचे असते, विद्यालयातील शिक्षणातून विद्यार्थी शिस्त व चांगले विचार आत्मसात करीत असतात.विद्यार्थ्यांच्या त्या काळातील शिक्षकांची भूमिका महत्त्वाची असून सुनील माळी सर यांनी आपल्या शिक्षणाच्या योगदानातून इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळात सेवा देत असताना अनेक विद्यार्थी घडवले असे मत इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव मनोहर चौधरी यांनी व्यक्त केले.

महात्मा फुले विद्यालय बिजवडी (इंदापूर) येथील सहशिक्षक सुनील भागवत माळी हे वयोमानानुसार निवृत्त झाले त्या निमित्ताने आयोजित केलेल्या निरोप समारंभ व सत्कार कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी सुनील माळी व त्यांच्या कुटुंबीयांचे विद्यार्थ्यांनी फुलांचा वर्षाव करत शाळेच्या प्रांगणात स्वागत केले.

यावेळी बोलताना मनोहर चौधरी म्हणाले विद्यालयीन शिक्षण घेत असतानाच विद्यार्थ्यांना शिस्तीचे, वेळेचे व व्यायामाचे खरे महत्त्व कळते. या काळात शिक्षकांची भूमिका अतिशय महत्त्वाची असते. माळी सरांनी आपल्या सेवेच्या काळात ही भूमिका अतिशय चोख व इमानदारीने पार पाडली. त्यामुळे आज माळी सरांच्या हातून शिक्षण घेतलेले अनेक विद्यार्थी विविध क्षेत्रांत उल्लेखनीय काम करीत आहेत.सुनील माळी यांनी गणित विज्ञान व क्रीडा विषयात आपले योगदान दिले आहे. त्याचबरोबर सुरुवातीची सेवा श्री नारायणदास रामदास हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज इंदापूर या ठिकाणी ३३ वर्ष व महात्मा फुले विद्यालय बिजवडी या ठिकाणी २ वर्ष ९ महिने अशी सेवा बजावली. सरांच्या सेवेबद्दल प्रशासकीय कामकाजामध्ये शालेय कामकाजात ठसा उटवला. विद्यार्थी प्रिय आदरयुक्त शिक्षक या नात्याने माळी सर यांना ओळखले जाते.

त्याचबरोबर श्री नारायणदास रामदास सेवक सहकारी पतसंस्थेचे सचिव पदाचे कारकीर्द ही त्यांनी उत्कृष्टपणे पार पाडली. यावेळी इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी सेवानिवृत्ती निमित्ताने सुनील माळी यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

यावेळी कर्मयोगी सहकारी साखर कारखान्याचे संचालक छगन भोंगळे, मच्छिंद्र अभंग, अमोल भिसे,कमाल भाई सय्यद देविदास यादव, तसेच इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळातील आजी-माजी मुख्याध्यापक व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक महात्मा फुले विद्यालयाचे मुख्याध्यापक विकास फलपले यांनी केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रघुनाथ पन्हाळकर यांनी केले. कार्यक्रमाचे आभार शंकर हुबाले यांनी व्यक्त केले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महात्मा फुले विद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थ्यांनी सहकार्य केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button