Uncategorized

पुणे जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण समिती सभापतीपदी इंदापूर तालुक्यातील अंकिता पाटील– ठाकरे.

विजय शिंदे

पुणे जिल्हा परिषदेच्या विविध चार विषय समित्यांच्या सभापतीपदी मावळ, वेल्हे, इंदापूर आणि हवेली या तालुक्यातील अनुक्रमे दीपाली हुलावळे, अमोल नलावडे, अंकिता पाटील आणि जितेंद्र बढेकर यांचे नाव निश्चित करण्यात आले आहे.

यानुसार दीपाली हुलावळे आणि अमोल नलावडे या दोघांपैकी एकाची बांधकाम व आरोग्य समिती सभापतीपदी तर दुसऱ्यांची कृषी व पशुसंवर्धन समिती सभापतीपदी निवड जाहीर केली जाणार आहे.

महिला व बालकल्याण समिती सभापतीपदी इंदापूर तालुक्यातील अंकिता पाटील यांची तर, समाजकल्याण समिती सभापतीपदी हवेली तालुक्यातील जितेंद्र बढेकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. या निवडीमुळे खेड, जुन्नर, शिरूर आणि बारामती या तालुक्यांचा यावेळी पत्ता कट झाला आहे.

पुणे जिल्हा परिषदेतील सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व सदस्यांची बैठक गुरुवारी (2 एप्रिल) सकाळी 10.30 वाजता जिल्हा परिषद अध्यक्ष वीरधवल जगदाळे यांच्या बंगल्यावर सुरू झाली. या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) अध्यक्षा व उपमुख्यमंत्री सूनेत्रा पवार यांनी सभापती पदांसाठी पाठवलेले बंद पाकिट उघडण्यात आले. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष वीरधवल जगदाळे, उपाध्यक्ष विवेक वळसे-पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा परिषद गटनेते श्रीमंत ढोले आणि सर्व सदस्य उपस्थित होते. सभापती पदांसाठीची समितीनिहाय नावे जाहीर झाल्यानंतर पक्षाच्या सर्व जिल्हा परिषद सदस्यांनी एकमताने या नावांवर शिक्कामोर्तब केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button