Uncategorized

इंदापूर तालुक्यातील मुदत संपलेल्या ६१ ग्रामपंचायतींच्या प्रभाग रचना जाहीर.

विजय शिंदे.

वर्षभरामध्ये मुदत संपत असलेल्या ग्रामपंचायतींच्या निवडणुका घेण्याच्या अनुषंगाने प्रशासकीय पातळीवर हालचाली सुरू झाल्या आहेत.इंदापूर तालुक्यातील ६१ ग्रामपंचायतींची प्रशासनाकडून प्रभाग रचना जाहीर झाली आहे. या निवडणुकीच्या निमित्ताने ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा धुरळा उडणार असून, गावागावातील राजकारण तापणार आहे.

वर्षभरामध्ये मुदत संपत असलेल्या वा संपलेल्या ग्रामपंचायतींच्या निवडणुकीच्या अनुषंगाने प्रशासकीय पातळीवर हालचाली सुरू झाल्या आहेत. निवडणूक आयोगाच्या निर्देशाप्रमाणे प्रभाग रचना निश्‍चित करण्याचा कार्यक्रम महसूल प्रशासनाकडून जाहीर केला आहे. त्यामध्ये तालुक्यातील ६१ व पूर्वी प्रभाग रचना जाहीर झालेल्या २० ग्रामपंचायत च्या निवडणुका येत्या काही दिवसात जाहीर होणार आहेत.

इच्छुकांसह राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणीला सुरवात केली आहे.सक्षम लोकनियुक्त सरपंचपदाच्या उमेदवारासह ग्रामपंचायत सदस्यपदाच्या उमेदवारांचा शोध घेण्यास सुरवात केली आहे.


दृष्टिक्षेपात कार्यक्रम
प्रारूप प्रभाग रचना जाहीर : ७ एप्रिल, २०२६.

प्रभाग रचनेवर हरकती दाखल करण्याची अंतिम मुदत १३ एप्रिल, २०२६

प्राप्त हरकतींवर सुनावणी : २१ एप्रिल, २०२६

सुनावणीचा अभिप्राय जिल्हाधिकार्‍यांना सादर करणे : २३ एप्रिल, २०२६

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button