श्री छत्रपती कारखाना राज्यातील पहिल्या पाच कारखान्यांमध्ये आणला जाईल; पृथ्वीराज घोलप

छत्रपती सहकारी साखर कारखान्याला आपल्याला पुर्ववैभव आणण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार ,क्रीडामंत्री दत्तात्रय भरणे सहकारातील ज्येष्ठ नेते पृथ्वीराज बापू जाचक यांच्या नेतृत्वाखाली जास्तीत जास्त सर्व घटकांना ,वेगवेगळ्या समाजाला समावून घेण्याचा प्रयत्न केला श्री जय भवानी माता पॅनल मध्ये करण्यात आला असून कारखान्याला पुर्वीचे चांगले दिवस आणण्यासाठी आम्ही संचालक मंडळ काम करू असा विश्वास छत्रपती सहकारी साखर कारखाना निवडणुकीतील श्री जय भवानी माता पॅनलचे उमेदवार पृथ्वीराज घोलप यांनी व्यक्त केला.
छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी प्रचार अंतिम टप्प्यात आला असून उमेदवार घरोघरी जाऊन प्रचार करत आहेत.
यावेळी बोलताना पृथ्वीराज घोलप म्हणाले छत्रपती कारखाना सुस्थितीत आणण्यासाठी आम्ही संचालक मंडळ प्रयत्नांची शिकस्त करु.
यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार व मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या माध्यमातून छत्रपती शिक्षण संस्थेला २५ कोटी ची आर्थिक मदत करण्याचे आश्वासन अजित पवार यांनी दिले आहे. अजित दादा हे कामाच्या बाबतीत अतिशय दक्ष मानले जातात, त्यांची कामाची पद्धत संपूर्ण राज्याला माहित आहे ते स्वतः यामध्ये लक्ष घालणार असल्याने पृथ्वीराज चाचक यांच्या नेतृत्वाखाली कारखाना पूर्वस्थितीत आणला जाईल. श्री छत्रपती कारखाना राज्यातील पहिल्या पाच कारखान्यांमध्ये आणला जाईल. कारखाना कार्यस्थळावरील रस्ते व्यवस्थित केले जातील. यासाठी दादा व मामा यांच्या माध्यमातून राज्य पातळीवरून निधीची तरतूद करू.
कामगारांचे प्रश्न तसेच सभासदांचे इतरही प्रश्न हे नवीन संचालक मंडळ सोडवेल असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.



