पुणे जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुक मतांचे विभाजन टाळण्यासाठी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र.?
इंदापुरात आजी-माजी मंत्री येणार एकत्र..

विजय शिंदे
आगामी १२ जिल्हा परिषदा आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र लढणार.? याबाबतचा अंतिम निर्णय उद्यापर्यंत जाहीर होण्याची शक्यता आहे.
राज्यातील महापालिका निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादींना जोरदार झटका बसल्यानंतर शनिवारी बारामतीत ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार यांच्याकडे महत्त्वाची बैठक पार पडली या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार, कृषिमंत्री दत्तात्रय भरणे, खासदार सुप्रिया सुळे, खासदार अमोल कोल्हे, माजी मंत्री आमदार जयंत पाटील, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, माजी मंत्री राजेश टोपे, आमदार रोहित पवार आदींची उपस्थिती होती.
ग्रामीण महाराष्ट्रात शरद पवार यांच्या विचारांचा पगडा आजही कायम आहे. मात्र, बदललेल्या राजकीय परिस्थितीत मतांचे विभाजन होऊन त्याचा फटका बसू नये, यासाठी दोन्ही राष्ट्रवादींनी (शरद पवार गट आणि अजित पवार गट) कंबर कसली आहे. जिथे शक्य आहे, तिथे एकत्रितपणे निवडणूक लढवण्यावर या बैठकीत शिक्कामोर्तब करण्यात आले आहे.
इंदापूर तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी सूत्रांच्या माध्यमातून आलेल्या माहितीनुसार कृषिमंत्री दत्तात्रय भरणे व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील एकत्रित निवडणूक लढवणार असल्याची माहिती समोर आली आहे. यानुसार राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला जिल्हा परिषदेच्या ३ व पंचायत समितीच्या ७ जागा मिळणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जिल्हा परिषदेच्या ५ व पंचायत समितीच्या ९ जागा लढवणार असल्याची चर्चा आहे.उद्या (रविवार दि १८) दिवसभरात घडामोडींना वेग येणार असून दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांना झालेल्या आघाडी संदर्भात व जागा वाटप संदर्भात माहिती दिली जाणार असल्याची विश्वसनीय माहिती मिळाली आहे.
बारामती येथील बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी रणनीती स्पष्ट केली. ते म्हणाले:”आजची भेट केवळ निवडणुकांच्या नियोजनासाठी होती. आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकांनाही एकत्रित सामोरे जाण्याचा आमचा विचार आहे. यासाठीच आम्ही पवार साहेबांची परवानगी घेण्यासाठी आलो होतो.



