Uncategorized

इंदापुरात आज “भाजप” घेणार इच्छुकांच्या मुलाखती.

विजय शिंदे.

आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टी इंदापूर यांच्या वतीने इच्छुक उमेदवारांची महत्त्वपूर्ण बैठक व मुलाखती गुरुवार, दि.१५ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता सोनाई पॅलेस इंदापूर येथे आयोजन केले आहे. जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाच्या वतीने कार्यक्रम जाहीर करण्यात आला असून इंदापूर तालुक्यात हालचालींना वेग आला आहे.या बैठकीत जिल्हाध्यक्ष शेखर वढणे, माजी आमदार यशवंत माने, जिल्हा परिषदेचे माजी सभापती प्रवीण माने व भारतीय जनता पक्षाचे सर्व वरिष्ठ पदाधिकारी सर्व मंडल अध्यक्ष इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेणार आहेत.

यावेळी मयूरसिंह पाटील, आकाश कांबळे, माऊली चवरे, मारुती वनवे, गजानन वाकसे, रामचंद्र निंबाळकर, बाबासाहेब चवरे, तानाजी थोरात, सचिन आरडे, नानासाहेब शेंडे, शिवाजी निंबाळकर, तेजस देवकाते, रामभाऊ आसबे, राजकुमार जठार, किरण गानबोटे, माऊली वाघमोडे उपस्थित राहणार आहेत.इंदापूर तालुक्यांतील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांसाठी इच्छुक उमेदवारांचा सामाजिक सहभाग, संघटनात्मक कार्य, स्थानिक प्रश्नांची जाण, जनतेशी असलेला थेट संपर्क तसेच पक्षविचाराशी असलेली निष्ठा यांचा सखोल आढावा मुलाखतीदरम्यान घेतला जाणार आहे. बैठकीत आगामी निवडणुकांची रणनीती, बूथस्तरीय संघटन मजबूत करणे, स्थानिक स्वराज्य संस्थांमधील प्रश्न यासंदर्भात चर्चा होणार आहे.

या बैठकीसाठी ज्येष्ठ नेते प्रदीप गारटकर ही उपस्थित राहण्याची शक्यता आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button