“छत्रपती साखर कारखान्याच्या विस्तार वाढीचा प्रकल्प ९० ते ९५ कोटी होत असताना कोर्टकचेऱ्यांमुळे हा प्रकल्प १८० कोटीपर्यंत गेला.
विजय शिंदे
सहकार क्षेत्रातील आपण तज्ञ आहोत असे भासवून निवडणुकीत पडून सुद्धा संचालक मंडळाच्या बैठकीत बसून कारखान्याची व्यवस्थित चाललेली घडी विस्कटण्याचे काम पृथ्वीराज जाचक यांनी केले, त्यांच्यामुळे निवडणूक पाच वर्षा ऐवजी दहा वर्षांवर गेली तिथेच खऱ्या अर्थाने छत्रपती सहकारी साखर कारखान्याची घरी विस्कटली याला जबाबदार पृथ्वीराज जाचक असल्याचा आरोप छत्रपती बचाव पॅनलच्या प्रमुखांनी केला आहे.
कोर्ट-कचेरीच्या नादामध्ये छत्रपती साखर कारखाना आर्थिक अडचणीत गेला. कारखान्याच्या आर्थिक विवंचनेत कोणाचा हातभार लागला आहे, हेदेखील सभासदांना चांगले माहीत झाले आहे. त्यामुळे त्यांना त्यांची जागा सभासद दाखविल्याशिवाय राहणार नाहीत,” अशी टीका छत्रपती बचाव पॅनेलचे प्रमुख मुरलीधर निंबाळकर यांनी केली.
निरगुडे (ता. इंदापूर) येथे छत्रपती बचाव पॅनेलच्या प्रचारात जाहीर सभेचे आयोजन केले होते. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी बोलताना निंबाळकर म्हणाले “छत्रपती साखर कारखान्याच्या विस्तार वाढीचा प्रकल्प ९० ते ९५ कोटी होत असताना कोर्टकचेऱ्यांमुळे हा प्रकल्प १८० कोटीपर्यंत गेला. यामधूनच कारखान्याची आर्थिक अडचण झाली आहे. विस्तारवाढीच्या प्रकल्पासाठीच नाही तर प्रत्येक गोष्टीमध्ये सततची कोर्ट कचेरी, हे या आर्थिक अडचणीचे मुळ कारण ठरले आहे. कोर्ट कचेरीबरोबरच स्वतःच्याच नेतृत्वात सगळं झालं पाहिजे, हा हेकेखोरपणा सुद्धा या बिनविरोध निवडणुकीसाठी अडथळा बनला. त्यामुळे केवळ आमच्यावर टीकाटिकपणे करण्यापेक्षा आपण हे आत्मपरीक्षण करण्याचे आवश्यकता आहे.”
यावेळी उमेदवार तानाजी थोरात यांनी जय भवानी पॅनेलचे प्रमुख पृथ्वीराज जाचक यांच्यावर टीका केली. ते म्हणाले, “सहकार कायद्यातील सर्वाधिक माहिती आपल्याला आहे, असे मिरवणाऱ्यांनी निवडून न येता दीड वर्षे संचालक मंडळाच्या बैठकीमध्ये बसून
कारखान्यात अडचणी आणण्याचे काम केले.
यावेळी बोलताना माजी चेअरमन अविनाश घोलप म्हणाले मी चेअरमन असताना सर्वाधिक दर सभासदांच्या उसाला दिला, सभासदांनी आमच्या हातात सत्ता दिल्यास पूर्वीचे गतवैभव कारखान्याला प्राप्त करून देऊ.
यावेळी अविनाश मोटे, पद्मजा भोसले, रविशंकर पवार, हनुमंत काजळे, करणसिंह घोलप यांनी मनोगते व्यक्त केली.



