शंकरराव पाटील चॅरिटेबल ट्रस्टच्या ‘जावेद हबीब अकॅडमी, इंदापूर’ मार्फत हेअर-ब्यूटी क्षेत्रातील करियर मार्गदर्शन कार्यशाळा संपन्न.

विजय शिंदे
शंकरराव पाटील चॅरिटेबल ट्रस्टच्या जावेद हबीब अकॅडमी, इंदापूर च्या माध्यमातून संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती पद्माताई भोसले, सचिव डॉ.गिरीश देसाई, खजिनदार श्री.तुषार रंजनकर व विश्वस्त श्री.अरविंद गारटकर यांच्या मार्गदर्शनाखाली हेअर-ब्यूटी क्षेत्रातील करियर गाईडन्स या विषयावर आज दिनांक १२ रोजी एकदिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली. या कार्यशाळेसाठी जावेद हबीब अकॅडमीचे टेक्निकल हेड श्री. महेश गोरे हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते.
या कार्यशाळेमध्ये सौंदर्यसृष्टीतील करिअरच्या संधी, आधुनिक हेअर स्टाईलिंग तंत्रज्ञान, यशस्वी उद्योजक होण्यासाठी लागणारे कौशल्य, आणि प्रशिक्षणाची महत्त्वाची भूमिका यावर सखोल मार्गदर्शन करण्यात आले. श्री. महेश गोरे सर यांनी स्वतःच्या अनुभवांच्या आधारे विद्यार्थ्यांना प्रेरणा देणारे विचार मांडले.
कार्यक्रमाला परिसरातील अनेक विद्यार्थी, हेअर-ब्यूटी क्षेत्रात करियर घडवू इच्छिणारे विद्यार्थी, नवोदित हेअर स्टायलिस्ट उपस्थित होते. उपस्थितांनी सेमिनाराबद्दल समाधान व्यक्त केले आणि अशा कार्यशाळांमुळे विद्यार्थ्यांना करिअरविषयी योग्य दिशा मिळत असते, असे मत व्यक्त केले.
कार्यशाळेतील सहभागी विद्यार्थ्यांना संस्थेचे खजिनदार श्री. तुषार रंजनकर सर, विश्वस्त श्री.अरविंद गारटकर सर, यांच्या हस्ते प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले.
कार्यक्रमाचे आयोजन शिस्तबद्ध पद्धतीने करण्यात आले असून, ट्रस्टचे इन्चार्ज श्री.दिपक जगताप सर, जावेद हबीब अकॅडमीचे प्रशिक्षक श्री.अमोल राऊत, ब्यूटी विभागाच्या सौ.रोहिणी जाधव मॅडम, मार्केटिंग प्रमुख केदार गोसावी, सहाय्यक भारत माने, विद्यार्थी अभिजित साळुंके, वैभव हवलदार, संग्राम यादव, प्रविण माने, कुमार गवळी, स्वप्निल साळुंके, सागर राऊत, सुरज जाधव, नीरज काशिद, यश मखरे, विराज गुजर. विद्यार्थिनी अश्लेषा बेंद्रे, वैष्णवी गुजर, प्रीतम करगळ यांनी कार्यशाळा यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी प्रयत्न केले.



