Uncategorized

राज्यभरातील प्राथमिक शिक्षकांच्या ऑनलाइन बदल्यांचा मार्ग मोकळा.

विजय शिंदे

गेल्या चार-पाच वर्षांपासून विविध न्यायालयीन कार्यवाही, लोकसभे पाठोपाठ विधानसभा निवडणुकांची आचारसंहिता यामुळे रखडलेल्या प्राथमिक शिक्षकांच्या बदल्यांना आता न्यायालयाने पुढील कोणतीही तारीख न देता थेट याचिका निकाली काढली.त्यामुळे राज्यभरातील प्राथमिक शिक्षकांच्या ऑनलाइन बदल्यांचा मार्ग मोकळा झाला आहे.

छत्रपती संभाजीनगरच्या खंडपीठात दाखल याचिकेची आंतरजिल्हा बदलीसाठी आपसी सेवा गृहीत धरण्याच्या संदर्भाने याचिकेची सुनावणी झाली. सुनावणीत शासनाने काढलेले २८ मार्च २०२५ चे परिपत्रक कोर्टाने रद्द केले आहे. खंडपीठाने पुढील कोणतीही तारीख न देता थेट याचिका निकाली काढल्याने शिक्षकांच्या ऑनलाइन बदल्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

या निर्णयामुळे शिक्षकांच्या परस्पर आंतरजिल्हा बदल्यानंतर नवीन जिल्ह्यातील सेवा वरिष्ठता ग्राह्य धरण्याचा एक चांगला निर्णय औरंगाबाद खंडपीठाकडून देण्यात आल्याने यात परस्पर आंतरजिल्हा बदलीनंतर नवीन जिल्ह्यातील सेवा वरिष्ठताही अंतर्गत जिल्हा बदलीसाठी ग्राह्य धरावी याबाबत निकाल देण्यात आला.

अशा होणार बदल्या

बदली प्रक्रियेवरील तांत्रिक स्थगिती हटविल्याने शिक्षक आता पोर्टलवर सेवा व वरिष्ठता दुरुस्त करून अंतर्गत बदल्यास पात्र ठरू शकतील. ज्यांची सेवा कमी असेल, त्याच वरिष्ठतेनुसार दोघांची गणना होणार आहे. ऑनलाईन पोर्टलवरील प्रोफाइलमध्ये आवश्यक दुरुस्ती कराव्या लागणार आहे. गटशिक्षणाधिकारी व प्राथमिक शिक्षणाधिकारी यांचे व्हेरिफिकेशन ३ ते ४ दिवसांत अपेक्षित असेल. नवीन बदल्यांचे वेळापत्रक १५ मे ते १६ जूनदरम्यान जाहीर होण्याची शक्यता आहे. शासनाच्या अधिकृत सूचनेनंतर पोर्टल अपडेट होणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button