इंदापूर

महागाईने ग्रासलेल्या जगात “जाधव” कुटुंबाने दिलेली ही मदत अनेकांना माणुसकीची शिकवण देते.

विजय शिंदे

इंदापूर तालुक्यातील शहा गावचे जाधव कुटुंब यांनी गेली २१ वर्षे राबविलेला उपक्रम हा कौतुकास्पद असून जाधव कुटुंबीय हे नेहमीच परिसरात सामाजिक काम करत असतात याचा आम्हाला अभिमान वाटतो असे मत इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मधुकर मामा भरणे यांनी व्यक्त केले.

इंदापूर तालुक्यातील शहा गावचे माजी सरपंच तात्यासाहेब जाधव व इंदापूर येथील शहा फिश मार्केटचे व्यापारी रमेश जाधव यांनी गावातील १२० मच्छीमार बांधवांना मोफत धान्य किटचे वाटप करून त्यांची दिवाळी गोड केली आहे.आज (१४) रोजी मधुकर भरणे यांच्या हस्ते धान्यकिट चे वाटप करण्यात आले, या किट मध्ये १० किलो साखर,१० किलो गरा, तेल, ५ किलो डाळ, साबण, १० किलो मैदा इत्यादी वस्तू चा समावेश आहे.

यावेळी पंचायत समिती चे माजी सदस्य सतीश पांढरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी सरपंच नानासाहेब नरोटे, माजी सरपंच तात्यासाहेब जाधव, माजी सरपंच विष्णू पाटील, रमेश जाधव, हर्षवर्धन जाधव,सुभाष जाधव,नितीन निकम उपस्थित होते.

या वेळी बोलताना मधुकर भरणे म्हणाले जाधव कुटुंब गेली २१ वर्ष मासेमारी करणाऱ्या बांधवांना निराधार कुटुंबांना दीपावली निमित्ताने अत्यावश्यक अन्नधान्य जीवनावश्यक वस्तूचे वाटप करत असते महागाईने ग्रासलेल्या जगात ही जाधव कुटुंबाने दिलेली ही मदत अनेकांना माणुसकीची शिकवण देते. यावेळी सतीश पांढरे यांनीही जाधव कुटुंबियांच्या या उपक्रमाचे कौतुक केले. या वेळी बोलताना रमेश जाधव म्हणाले गेली २१ वर्ष मत्स्य व्यवसाय करणाऱ्या नागरिकांना मदत म्हणून दिवाळीचे साहित्य मोफत देत असताना यातून वर्षभर काम करण्याची ऊर्जा मिळते. आमचे ज्येष्ठ बंधू तात्यासाहेब जाधव यांनी ही संकल्पना सुरू केली असून आम्ही बंधू जिवंत आहे तोपर्यंत तसेच आमची पुढची पिढी ही हा उपक्रम अखंडपणे सुरू ठेवेल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button