अन्यथा आंदोलन करू; शिवसेना UBT पक्षाचे इंदापूर आगार प्रमुखांना निवेदन.

दि.१२/५/२०२५ रोजी संध्याकाळी काही महीला वडपुरी, शेटफळ हवेली, सुरवडला जाण्यासाठी थांबल्या होत्या वादळी वाऱ्यासह पावसाचे वातावरण निर्माण झाले होते विजा चमकत होत्या अंधार पडत चालला होता अशावेळी संध्याकाळी 6.40 व 7.10 वाजता इंदापूर अकलूज अनुक्रमे गाडी नंबर MH 14 BT 1099 चालक क्र 37471,ΜΗ 14 BT 1238 चालक क्र 42077 या दोन्ही गाड्या न थांबता निघून गेल्या त्यामुळे महिला भयभीत झाल्या व खाजगी वाहनासाठी इकडे तिकडे धावपळीला सुरुवात झाली ही बाब अत्यंत गंभीर आहे तरी या वाहनचालकावरती आपल्या स्तरावर त्वरित कारवाई करण्यात यावी अशी मागणी इंदापूर तालुका शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) वतीने करण्यात आली आहे.तसेच बायांचे निवेदन आघाडी व्यवस्थापक यांना देण्यात आले आहे. या निवेदनात म्हटले आहे की येथून पुढे सर्व गाड्या येथे थांबवण्यासाठी आपल्या स्तरावर आदेश देण्यात यावे.
संबंधित चालक वाहक यांच्यावर कारवाई केल्याचे लेखी पत्र आम्हाला मिळावे अन्यथा आपल्या कार्यालयासमोर शिवसेना स्टाईलने आंदोलन करण्यात येईल कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास संपूर्ण जबाबदारी आपले राहील.



