रुई येथील हर घर जल योजना पाण्याच्या पाईप लाईनचे काम तात्काळ चालू करावे; महसूल मंत्री बावनकुळे यांच्या बारामती प्रशासनाला सूचना.
ग्रामस्थांच्या आंदोलनाला यश.

रुई येथील हर घर जल योजना पाण्याच्या पाईप लाईनचे काम तात्काळ चालू करावे या मागणीसाठी ग्रामस्थांनी इंदापूर तहसील कार्यालय येथे उपोषण धरले या मागणीला यश आले असून महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आंदोलन कर्त्याच्या मागणीची दखल घेऊन प्रशासनाला काम तत्काळ सुरू करण्याच्या आदेश दिले असल्याचे भारतीय जनता पार्टीचे पुणे जिल्हा महामंत्री आकाश कांबळे यांनी सांगितले.रूई बाबीर येथील हर घर पेयजल योजना खूप दिवसापासून प्रलंबित होती जानेवारी २०२५ मध्ये पत्र व्यवहार करून देखील प्रशासनाने कोणतीही कारवाई न केल्यामुळे बारामती याठिकाणी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना पुणे जिल्हा महामंत्री आकाश कांबळे यांनी रुई येथील हर घर जल योजना बऱ्याच दिवसापासून काम बंद असल्याचे सांगितले.
यावरती तात्काळ प्रांत अधिकारी वैभव नावडकर यांना योजना तात्काळ चालू करण्याचे आदेश देण्यात आले असल्याचे कांबळे म्हणाले.त्यामुळे अडचण निर्माण करणाऱ्यांवर कारवाई करावी असे सांगण्यात आल्याचे कांबळे म्हणाले. आज इंदापूर तहसील कार्यालयाच्या समोर रुई ग्रामस्थांच्या वतीने एक दिवसीय आंदोलन करण्यात आलेले होते. या आंदोलनाला इंदापूर तालुक्याचे तहसीलदार जीवन बनसोडे यांनी भेट देवून संबंधित प्रश्नांना न्याय देण्यासाठी वालचंदनगर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक यांना पोलीस बंदोबस्तामध्ये पिण्याच्या पाण्याची पाईपलाईनचे काम त्वरित चालू करण्याची कार्यवाही करण्याचे आदेश दिले आहेत.
यावेळी जनार्दन पांढरमिसे,आकाश कांबळे, आबासाहेब थोरात, यशवंत कचरे, तानाजी मारकड, अनिल कांबळे, प्रविणकुमार शहा, अविनाश मोहिते, सतिश झेंडे, भाजपा पुणे जिल्हा अनुसूचित जाती मोर्चाचे जिल्हाध्यक्ष मयूर कांबळे, ॲड किशोर अडसूळ, बंडु डोंबाळे आदी ग्रामस्थ उपस्थित होते.



