इंदापूर पंचायत समिती आरक्षण सोडत; अनेक इच्छुकांच्या गणाचे “घुंगरू” हरवले.

विजय शिंदे
इंदापूर पंचायत समिती सदस्यांसाठी आरक्षण सोडत सोमवार दिनांक (१३) रोजी तहसीलदार जीवन बनसोडे यांच्या उपस्थितीत काढण्यात आली. या आरक्षण सोडतीनंतर कही खुशी कही गम अशी स्थिती झाली. अनेकांच्या आशेवर पाणी फेरल्या गेले तर अनेकांना संधी चालून आली आहे.
इंदापूर पंचायत समिती सदस्य पदासाठी एकूण १६ जागा साठी आरक्षण जाहीर करण्यात आले.
स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लांबल्यामुळे मागील कित्येक दिवसांपासून इच्छुकांची रेलचेल झालेली होती. अनेक मातब्बारांनी राजकीय पक्षांसोबत जनतेशीही अचानक संपर्क वाढवून जिल्हा परिषदेच्या व पंचायत समितीच्या सदस्यांची स्वप्ने पाहिलेली होती. मात्र, आरक्षण जाहीर झाल्यानंतर काहींचा भ्रमनिरास झाला तर काही उमदेवारांना अचानक लॉटरी लागणार आहे.
आठ ही जिल्हा परिषदेच्या गटात निवडणुकीच्या तयारीसाठी अनेक इच्छुकांनी मोर्चेबांधणी करत संपर्क वाढवलेला होता. मात्र, काही गट राखीव झालेले असल्यामुळे तोच संपर्क इतर उमेदवारांना प्रभावीत करणार असल्यामुळे कही खुशी कही गम असे वातावरण आहे.
आरक्षण खालील प्रमाणे जाहीर झाले आहे..
भिगवण: सर्वसाधारण स्त्री
शेटफळगढे: सर्वसाधारण
पळसदेव: सर्वसाधारण स्त्री
बिजवडी: नागरिकांचा मागास प्रवर्ग.
माळवाडी: सर्वसाधारण स्त्री
वडापुरी: सर्वसाधारण स्त्री
निमगाव केतकी: नागरिकांचा मागास प्रवर्ग
शेळगाव: सर्वसाधारण
बोरी: सर्वसाधारण
वालचंदनगर: अनुसूचित जाती(महिला)
लासुर्णे : अनुसूचित जाती (पुरुष)
सणसर: अनुसूचित जाती(महिला)
काटी: सर्वसाधारण
लाखेवाडी: नागरिकांचा मागास प्रवर्ग स्री
बावडा: नागरिकाचा मागास प्रवर्ग स्री
लुमेवाडी: सर्वसाधारण



