इंदापूर
भाजप प्रवेशा आधीच मानेंचा इंदापुरात भावी आमदार असा उल्लेख असलेला बॅनर..!!

विजय शिंदे
इंदापूर विधानसभेची अपक्ष निवडणूक लढवलेले पुणे जिल्हा परिषदेचे माजी सभापती प्रवीण माने हे भाजपमध्ये दोन जुलै रोजी प्रवेश करणार आहेत, त्या अगोदरच इंदापूर शहरात तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यातील वार वैष्णव भक्तांचे स्वागत करण्यासाठी लावलेल्या बॅनर वरती प्रवीण माने यांचा भावी आमदार असा उल्लेख करण्यात आला आहे.
इंदापुरात महायुतीचे विद्यमान आमदार दत्तात्रय भरणे हे देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात क्रीडा व अल्पसंख्यांक ,युवक कल्याण मंत्री आहेत, माने यांच्या संभाव्य भाजप प्रवेशाने भविष्यात महायुतीमध्ये भरणे विरुद्ध माने असा संघर्ष सुरू होणार असल्याचे बोलले जात आहे. या बॅनरची सर्वत्र चर्चा सुरू आहे.भाजपचे पूर्व मंडल अध्यक्ष राम आसबे मित्रपरिवाराच्या वतीने हा बॅनर लावण्यात आला आहे.



