इंदापूर

पाचशे रुपयांच्या बनावट नोटा बाळगत चलनात आणण्याचे प्रयत्न करणाऱ्या झारखंड येथील दोघांना अटक.

इंदापूर पोलिसांची कामगिरी.

विजय शिंदे

इंदापूर बस स्थानकावर पाचशे रुपयांच्या बनावट नोटा बाळगत चलनात आणण्याचे प्रयत्न करणाऱ्या झारखंड येथील दोघांना अटक करण्यात इंदापूर पोलिसांना यश आले आहे.


याबाबत अधिक माहिती अशी की, रविवार (ता.04 मे) रोजी रात्री 11 वाजताच्या दरम्यान इंदापुर बसस्थानकावरील रिक्षा चालक संतोष मखरे यांनी पोलिसांना इंदापुर बस स्थानकावर अनोळखी दोन इसम हे बनावट नोटा बाळगुन त्या बदल्यात वस्तु खरेदी करीत असल्याबाबत बाबत कळविले त्यानुरूप पोलिस निरीक्षक सूर्यकांत कोकाणे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक जीवन मोहिते, पोलीस अंमलदार अंकुश माने ,योगेश गोलांडे, सौरभ पाटील, आण्णा कोळेकर, गणेश डेरे, तुषार चव्हाण महिला पोलिस अंमलदार ज्योती विभूते, अश्विनी क्षत्रिय , काजल शेळके यांच्या पथकाने बस स्थानकावर सापळा रचत सबंधित दोघांना ताब्यात घेत पोलिस स्थानकात आणल्यावर अधिक चौकशी केली असता त्यांची नावे आसिफ सिराजुल शेख (वय 25 वर्षे धंदा.मजुरी मुळ रा.अमानत दिआरा, पो.प्यारपुर, ता.उधवा, थाना नाधानगर, जि.साहेबगंज, राज्य झारखंड) व हलिम जब्बार सय्यद (वय 45 वर्षे, सध्या रा.दाना बंदर मस्जीद बंदर, मुंबई, मुळ रा.पिअरपुर, ता.नाथसागर, जि.साहेबगंज राज्य झारखंड) अशी निष्पन्न झाली.


यावेळी पंचांसमक्ष पोलिसांनी दोघांची अंगझडती घेतली असता आसिफ सिराजुल शेख यांचेकडे पाचशे रुपयांच्या एकुण 26 बनावट नोटा व मोबाईल मिळुन आला.तर हलिम जब्बार सय्यद याच्या अंगझडतीमध्ये काही एक मिळुन आले नाही.त्यानंतर सदर नोटांची पडताळणी बँकेचे अधिकारी व पंचांच्या समक्ष मशीन द्वारे करून सदर नोटा बनवत असल्याची खात्री करीत वरील दोन कपिल विरोधात 500 रूपये दराच्या 26 बनावट भारतीय चलनी नोटा हया खोटया आहेत हे माहीत असतानाही ख-या म्हणून वापरण्या करीता कब्जात बाळगलेल्या स्थितीत मिळुन आल्या प्रकरणी सरकारच्या वतीने सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन मोहिते यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button