Uncategorized

भाटनिमगाव येथे श्रीराम नवमी व संत बाळूमामा भंडारा उत्सव मोठ्या उत्साहात संपन्न..

विजय शिंदे

जय जय श्रीराम.. बाळूमामांच्या नावानं चांगभलं… हालसिद्धनाथांच्या नावानं चांगभलं… अशा अखंड जयघोषात आणि सुमारे दोन टन भंडाऱ्याच्या उधळणीत भाटनिमगाव (ता. इंदापूर ) येथे श्रीराम नवमी व बाळूमामा भंडारा उत्सव भक्तिमय वातावरणात पार पडला.

हलगी चा निनाद, डीजे चा दणदणाटात करून भंडाऱ्याची उधळण करण्यात आली. उत्सवाची सुरुवात पालखी पूजनाने झाली. त्यानंतर देवाची पालखी सोहळा निघाली. अखंड वादन आणि भंडाऱ्याची उधळण यामुळे संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला.

या प्रसंगी बाळूमामांचे जीवन चरित्र कथाकार विक्रम जगताप (मेजर वासुंदेकर ) यांचे सद्गुरु बाळूमामा जीवन चरित्र यावर किर्तन संपन्न झाले, त्यांना भाटनिमगाव व परिसरातील भजनी मंडळी यांनी साथ दिली. यावेळी सर्व ग्रामस्थांच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. उत्सव समिती, तरुण मंडळ, ग्रामस्थ आणि ग्रामपंचायत यांनी सोहळ्याचे नेटके नियोजन केले, सदर कार्यक्रमासाठी मदत केलेल्या सर्व अन्नदाते वर्गणीदार यांचे आभार मानण्यात आले.

सारे गाव पिवळेधमक…

इंदापूर तालुक्यातील भीमा नदीच्या काठावर वसलेल्या भाटनिमगाव गावात श्रीराम नवमी व बाळूमामांच्या भंडारा निमित्ताने पंचक्रोशीतील अनेक भक्तगण उपस्थित होते. उत्सवासाठी आलेल्या भाविकांनी भंडाऱ्याची इतकी उधळण केली की गल्ल्या, रस्ते आणि मध्यवर्ती चौक पूर्णपणे पिवळेधमक झाले होते. काही ठिकाणी भंडाऱ्याचा थर साचल्याचे चित्र पाहायला मिळाले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button