Uncategorized

इंदापूरच्या रमेश (आबा) शिंदे कडे मोठी जबाबदारी.!कामगारांच्या प्रश्नांना अधिक प्रभावीपणे न्याय देणार.

विजय शिंदे

तळागाळातील कामगारांच्या हक्कासाठी दोन दशकांपासून झटणाऱ्या रमेश विठ्ठल शिंदे यांना आता मोठी जबाबदारी मिळाली आहे. महाराष्ट्र इमारत बांधकाम व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या सनियंत्रण समितीच्या इंदापूर तालुकाध्यक्षपदी त्यांच्या निवडीमुळे कामगारांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.

साधारणतः हे पद स्थानिक आमदारांकडे असते. मात्र, कार्यकर्त्यांवर विश्वास ठेवत आणि कामगारांच्या प्रश्नांना अधिक प्रभावीपणे न्याय देण्याच्या हेतूने कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी ही जबाबदारी शिंदे यांच्या खांद्यावर सोपवली आहे. त्यांच्या या निर्णयातून कार्यकर्त्यांवरील विश्वास आणि कामगार-केंद्रित दृष्टिकोन अधोरेखित झाला आहे.

२००२ पासून बांधकाम क्षेत्रात सक्रिय असलेले रमेश शिंदे यांनी कामगारांसाठी सातत्याने संघर्ष केला आहे. वंचित घटकांपर्यंत योजनांचा लाभ पोहोचवण्यासाठी त्यांनी शासन दरबारी वेळोवेळी पाठपुरावा केला आहे. कामगारांना रोजगार उपलब्ध करून देणे, त्यांच्या हक्कांसाठी लढणे आणि त्यांना विविध शासकीय योजनांशी जोडणे यामध्ये त्यांचे मोलाचे योगदान राहिले आहे.

विशेषतः कामगार कल्याण मंडळाकडे नोंदणी करून हजारो कामगारांना विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यात शिंदे यांनी पुढाकार घेतला आहे. केंद्र सरकारच्या कौशल्य विकास उपक्रमांपासून ते इतर कल्याणकारी योजनांपर्यंत कामगारांना जोडण्याचे काम त्यांनी सातत्याने केले आहे. त्यामुळेच इंदापूर तालुक्यातील कामगारांमध्ये त्यांच्याबद्दल विश्वास निर्माण झाला आहे.

कृषिमंत्री भरणे यांचे विश्वासू व निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून ओळख असलेल्या शिंदे यांनी या संधीचे सोने करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. “कामगारांच्या हक्कांसाठी अधिक ताकदीने लढणार,” अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

या निवडीमुळे इंदापूर तालुक्यातील बांधकाम कामगारांना न्याय आणि हक्क मिळवून देण्याच्या चळवळीला नवसंजीवनी मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button