शासन सदैव महिलांच्या विकासासाठी कटीबद्ध – सभापती हर्षवर्धन लोंढे

विजय शिंदे
उमेद अंतर्गत महिला स्वयंसहायता समूहाने बचत गटाच्या पुढे जाऊन स्मार्ट च्या सहकार्याने महिला शेतकरी उत्पादक कंपनी सुरू केली ही खरोखर अभिमानाची गोष्ट असून कंपनीच्या व महिलांच्या विकासासाठी शासन सदैव कटिबद्ध आहे व आपल्याला कोणतीही मदत लागली तर आम्ही कायम आपल्या सोबत आहोत असे आश्वासन सभापती हर्षवर्धन लोंढे यांनी दिले.
इंदापूर तालुक्यातील पळसदेव बिजवडी जिल्हा परिषद गटातील समता महिला प्रभाग संघ अंतर्गत यशोग्राम महिला शेतकरी उत्पादक कंपनीचे भूमिपूजन सभापती लोंढे यांच्या हस्ते पार पडले यावेळी ते बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर उपसभापती जयकुमार कारंडे, दिलीप भिसे, प्रवीण काळे, गटविकास अधिकारी सचिन खुडे, नरूटवाडीचे समाधान कोकाटे, विशाल दिवसे,विशाल देवकर, अमोल वाघमोडे, तालुका अभियान व्यवस्थापक सचिन बाबर, आदित्य मांधळे, राणी ननवरे, स्मार्ट च्या प्रसिद्धा पाटील, संचालिका योगिता कचरे, रेश्मा रेडके, सविता सावंत, मोनाली दळवी, अर्चना भोसले, शबाना इनामदार, कीर्ती भोसले, आदी उपस्थित होते .
पुढे बोलताना सभापती लोंढे म्हणाले महिला आता उद्योजक म्हणून पुढे येत आहेत. महिला स्वयंसहायता समूहाच्या माध्यमातून आज महिला सक्षम होताना दिसत आहेत. उमेद अंतर्गत स्वयंसाहायता समूहातून महिला भरारी घेताना दिसते याचा अभिमान वाटतो. उमेद आणि कंपनीच्या माध्यमातून येणाऱ्या काळात महिला उद्योजक म्हणून नावारूपास येतील येते असा विश्वास सभापती हर्षवर्धन लोंढे यांनी व्यक्त केला. यावेळी बोलताना गट विकास अधिकारी म्हणाले आपल्याला फक्त तालुक्यात नाही तर जिल्ह्यात आणि राज्यात स्वतःची वेगळी ओळख निर्माण करायची आहे, उमेदच्या माध्यमातून महिला शेतकरी उत्पादक कंपनी आज आपण सुरू करत आहोत.
या कंपनीचे नावलौकिक हे संपूर्ण राज्यभर झाले पाहिजे. त्यासाठी आजपर्यंत फक्त प्रशासन तुमच्यासोबत होतं पण आता इथून पुढे शासन सुद्धा सोबतीला असेल. महिला भगिनींसाठी या कंपनीसाठी व उमेद साठी कोणतीही कसलीही मदत लागली तर आम्ही सदैव तत्पर आहोत व या कंपनीचे नावलौकिक वाढवण्यासाठी आपण सर्वजण मिळून हा नावलौकिक वाढवू असा विश्वास गटविकास अधिकारी खुडे त्यांनी व्यक्त केला. यावेळी उपसभापती जयकुमार कारंडे यांनी महिलांची वाढती उन्नती याचा अभिमान असून आपण सर्व महिला एकत्र येऊन हि कंपनी उभी करत आहात. येणाऱ्या काळात या कंपनीची उलाढाल हि कोटी मध्ये व्हावी व त्यासाठी आपण सर्वजण प्रयत्न करू असा विश्वास व्यक्त केला..कंपनीच्या संचालिका पूजा देवकर यांनी कंपनीचा लेखाजोखा व येणाऱ्या काळात आपल्याला काय करता येईल याविषयी आपले मनोगत व्यक्त केले. सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रभाग समन्वयक समाधान भोरकडे, प्रभाग संघ व्यवस्थापक आशिया शेख, ग्रामसखी शीतल जगताप,अश्विनी घाडगे, अश्विनी लोखंडे,उषा मिसाळ,अमृता बोगाने, ज्योती शिंगाडे, विद्या चव्हाण,रेश्मा तांबोळी, अनुराधा जावळे, गौरी घोरपडे, नम्रता पाडुळे, रेवती ढावरे, सर्व पदाधिकारी आदींनी परिश्रम घेतले.



