तक्रारवाडी ग्रामपंचायत सरपंच पदी प्राजक्ता वाघ.

विजय शिंदे
इंदापूर तालुक्यातील बहुचर्चित तक्रारवाडी ग्रामपंचायतीत भाजप पक्षाच्या प्राजक्ताताई सचिन वाघ यांची निवड वर्णी लागली आहे.सत्तेसाठीचा संघर्ष शिगेला पोहोचला होता.काही महिन्यांपूर्वी प्रशासकाच्या ताब्यात गेलेल्या या ग्रामपंचायतीत सरपंचपदाच्या निवडीचा कार्यक्रम (सोमवार दिनांक २७) जाहीर करण्यात आला होता. तक्रारवाडीच्या सरपंच पदी कोण विराजमान होणार हा प्रश्न तालुक्यात सर्वत्र विचारला जातो का यामध्ये प्राजक्ता वाघ यांनी बाजी मारली आहे.
गेले तीन महिने संपूर्ण इंदापूर तालुक्यातील जनतेचे लक्ष बनून राहिलेल्या तक्रारवाडी सरपंच निवडीवर अखेर पडदा पडला असून प्राजक्ताताई सचिन वाघ यांची नवनिर्वाचित सरपंच पदी वर्णी लागली आहे.
इंदापूर तालुक्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ घातल्या असताना तक्रारवाडी गावात भारतीय जनता पार्टीचा सरपंच झाल्याने शुभ संकेत मानले जात आहेत.
वाघ यांच्या निवडीनंतर सोनाई पॅलेस येथे सचिन वाघ व प्रमुख कार्यकर्त्यांचा सत्कार भारतीय जनता पार्टीचे नेते पुणे जिल्हा परिषदेचे माजी सभापती प्रवीण माने यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी बोलताना माजी सभापती भारतीय जनता पक्षाचे नेते प्रवीण माने म्हणाले तक्रारवाडी गावच्या सरपंच पदी प्राजक्ता ताईंची झालेली निवड ही सर्वतोपरी सार्थ असून, गेल्या अनेक काळापासून तक्रारवाडी गावातील जी प्रलंबित विकासकामे आहेत ती पूर्ण ताकदीने सुरू होणार असून, या कामी काही गरज असल्यास शासन दरबारी आपण पाठपुरावा करणार आहे.
या वेळी विजयकुमार गायकवाड,श्रीकांत काशिद, सूरज वाघ, सागर जगदाळे, यावेळी उपस्थित होते.



