Uncategorized

भारतीय जनता पक्षाकडून राम आसबे यांच्या नावाची चर्चा.. !!

इंदापूर तालुक्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी राजकीय हालचाली गतिमान झाल्या असून सर्वच पक्षीय इच्छुकांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे.

सोशल मीडियाच्या माध्यमातून तसेच पक्षातील वरिष्ठ नेत्यांना भेटून कार्यकर्ते आपल्या नेत्याला उमेदवारी मिळावी यासाठी मागणी करत आहेत.इंदापूर तालुक्यातील अतिशय प्रतिष्ठेचा झालेला माळवाडी वडापुरी जिल्हा परिषद गट सर्वसाधारण झाला असून या गटातून भारतीय जनता पक्षाचे पूर्व मंडल अध्यक्ष राम आसबे यांच्या नावाची चर्चा सुरू आहे.

राम आसबे हे गेली १२ वर्ष भारतीय जनता पक्षात विविध पदावर कार्यरत आहेत भाजपा युवा मोर्चा अध्यक्ष, तालुका सरचिटणीस व सध्या भारतीय जनता पक्षाच्या पूर्व मंडलाचे ते अध्यक्ष असून त्यांनी यापूर्वी (२०१७) भारतीय जनता पक्षाकडून पुणे जिल्हा परिषदेची (वडापुरी– काटी) निवडणूक लढवली आहे.

यावेळी राम आसबे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले भारतीय जनता पक्षाची निवडणुकीची तयारी सुरू असून पक्षश्रेष्ठी निर्णय घेतील त्या पद्धतीने आम्ही निवडणुकीला सामोरे जाणार आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून देशात व राज्यात विकासाची गंगा आली असून आणि लोकोपयोगी योजना सुरू झाल्या आहेत. त्यामुळे सर्वसामान्य जनता भारतीय जनता पक्षाच्या पाठीशी ठामपणे उभी आहे.इंदापूर तालुक्यात प्रवीण माने यांच्या नेतृत्वाखाली पक्षाची ताकद वाढली असून भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष शेखर वढणे यांच्या नियोजनाखाली पक्ष संघटना बळकट होत आहे. पक्षाने सूचना केल्यास जिल्हा परिषद किंवा पंचायत समितीसाठी माझी तयारी आहे. पक्ष देईल त्या उमेदवाराचे आम्ही काम करू.

या गटातून भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी प्रेमकुमार जगताप ही इच्छुक आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button