Uncategorized

जिल्हा परिषदेचे उमेदवारी नाही मिळाली तर सौभाग्यवतींना पंचायत समिती तरी द्या; माळवाडी वडापुरी गटात उमेदवारीसाठी मोठी स्पर्धा.

विजय शिंदे

इंदापूर तालुक्यात आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. तालुक्याच्या राजकारणाची दिशा ठरवणाऱ्या या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत कोणत्या गटावर कोणता पक्ष ‘गड’ सर करणार, याबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

अनेक इच्छुक उमेदवारांनी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली असून, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार गट),राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरद पवार गट) , भारतीय जनता पार्टी, शिवसेना (शिंदे गट), शिवसेना (ठाकरे गट) अपक्ष तसेच काही संघटनाही आपला उमेदवार देण्याच्या तयारीत आहेत, सर्वच राजकीय पक्षांनी देखील संभाव्य उमेदवारांची ‘चाचपणी’ सुरू केल्याची माहिती समोर येत आहे.

कोण मारणार बाजी.?

तालुक्यामध्ये वडापुरी माळवाडी हा जिल्हा परिषद गट सर्वसाधारण तसेच पंचायत समितीचे दोन्ही गण सर्वसाधारण महिला राखीव असल्याने प्रत्येक जागेसाठी तगडी स्पर्धा पाहायला मिळत आहे. या महत्त्वाच्या लढाईत दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस, भारतीय जनता पक्ष या प्रमुख पक्षांसह स्थानिक आघाड्यांमध्येही उमेदवारी मिळवण्यासाठी इच्छुकांमध्ये प्रचंड चुरस आहे.

पंचायत समितीसाठी रस्सीखेच..पंचायत समितीच्या गणांमध्येही गणातील प्रभावशाली व्यक्तीचे तसेच महिला कार्यकर्त्यां, आणि त्या त्या गणातील इच्छुक यांसारखे अनेकजण शड्डू ठोकून उभे आहेत जिल्हा परिषदेचे उमेदवारी नाही मिळाली तर सौभाग्यवतींना पंचायत समिती तरी द्या अशी प्रमुख कार्यकर्त्यांची धारणा आहे.

पक्षांकडून ‘सर्वेक्षण’ आणि ‘चाचपणी’..

सध्या राजकीय पक्षांचे वरिष्ठ नेते तालुक्यात गुप्तपणे सर्वेक्षण करत असल्याचे समजते. उमेदवाराची जनमानसात असलेली प्रतिमा, विजय होण्याची क्षमता, सामाजिक समीकरणे आणि मागील निवडणुकीतील कामगिरी या निकषांवर पक्षांकडून कठोर ‘चाचपणी’ केली जात आहे.

रणनीतीवर भर..विशेषतः गट व गण (आरक्षण) लक्षात घेऊन, प्रभावी व सर्वसमावेशक चेहरा देण्यासाठी पक्षांची रणनीती अंतिम टप्प्यात आहे. अनेक पक्ष युवा आणि नवीन चेहऱ्याला संधी देऊन निवडणुकीला एक वेगळे वळण देण्याचा विचार करत आहेत, जेणेकरून सत्ताधारी आणि विरोधक या दोघांनाही आव्हान देता येईल.कार्यकर्त्यांमध्ये उत्सुकता..पक्षांकडून अधिकृत घोषणा होण्यापूर्वीच, इच्छुकांनी त्यांच्या संपर्क क्षेत्रातील मतदारांच्या भेटीगाठी सुरू केल्या आहेत. कार्यकर्ते आणि सामान्य नागरिक देखील आपल्या गटातून आणि गणातून कोणाची वर्णी लागणार याकडे लक्ष ठेवून आहेत. आगामी काही दिवसांत उमेदवारी जाहीर झाल्यानंतर इंदापूर तालुक्याचे राजकीय चित्र अधिक स्पष्ट होईल.

माळवाडी वडापुरी गट गणातील गावे..

माळवाडी: कालठण नंबर दोन, माळवाडी, पिंपरी खुर्द, शिरसोडी, पडस्थळ, अजोती, सुगाव , शहा, सरडेवाडी, गोखळी, तरंगवाडी.

वडापुरी गण: कांदलगाव, तरटगाव, हिंगणगाव, बाभुळगाव, भाटनिमगाव, गलांडवाडी नंबर दोन, अवसरी, बेडशिंगे, भांडगाव, वडापुरी.

संभाव्य प्रभावी चेहरे..अभिजित तांबिले, सतीश पांढरे, ऋतुजाताई पाटील, संजय सोनवणे, दिलीप पाटील,शशिकांत तरंगे,पांडुरंग मारकड, महेश शिर्के, महेंद्र रेडके, नानासाहेब नरोटे,रवींद्र सरडे,विशाल मारकड, सचिन खामगळ, विष्णू पाटील, लक्ष्मण देवकाते, प्रकाश शिंदे, सुभाष बोंगाणे,अतुल व्यवहारे, बाळासाहेब व्यवहारे, अमोल इंगळे, अजित खबाले, सोमनाथ पिंपरे, सतीश चित्राव, हनुमंत जमदाडे,राजेंद्र पवार, गोपीचंद गलांडे, सतीश व्यवहारे, मोहन खबाले, शांतीलाल शिंदे, दादा तोबरे, अमोल चंदनशिवे, भागवत काटकर, संदेश शिंदे, मनोहर भोसले, शहाजी तोबरे,संजय देवकर, सिताराम जानकर, आप्पा माने, सुभाष गायकवाड, सोमनाथ जावळे, दत्तात्रय पांढरे,विठ्ठल महाडिक, महादेव पांढरे,सागर पेटकर यांच्यासह अनेक नेते मंडळी निवडणुकीच्या तयारीत आहेत.

आयात उमेदवारांची चर्चा..

माळवाडी वडापुरी हा जिल्हा परिषदेचा गट सर्वसाधारण झाल्याने या गटात शेजारील गटातील राष्ट्रवादीचे नेते दीपक जाधव यांच्या नावाची ही चर्चा आहे, त्याचबरोबर माजी सभापती करणसिंह घोलप या गटात लढण्यासाठी चाचपणी करत आहेत. जाधव यांचा पळसदेव गट ओबीसी साठी तर सणसर गट अनुसूचित जातीसाठी राखीव आहे.

२०२४ विधानसभा निवडणूक निकाल.

२०२४ झालेला विधानसभा निवडणूक निकालानुसार माळवाडी गणात कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या वर्चस्व दिसून येत आहे तर वडापुरी गणात माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांचे वर्चस्व दिसून येत आहे, यामध्ये अपक्ष उमेदवार व भाजपचे नेते प्रवीण माने यांना पडलेली मते निर्णायक ठरणार आहेत. उमेदवारीवरून होणारी बंडखोरी,अंतर्गत वाद, व योग्य उमेदवार विजयाचा “गड” चढण्यासाठी महत्त्वाचे ठरणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button