Uncategorized

सरपंच विजया पिंपरे यांचा ग्रामरत्न सरपंच पुरस्काराने सन्मान.

ग्रामविकासात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल इंदापूर तालुक्यातील गालाडवाडी २ ग्रामपंचायतच्या सरपंच विजया सोमनाथ पिंपरे यांना ग्रामरत्न सरपंच पुरस्काराने नुकतेच सन्मानित करण्यात आले. लोणावळा (पुणे) येथे पार पडलेल्या सोहळ्यात अखिल भारतीय सरपंच संघटनेचे अध्यक्ष जयंत पाटील तसेच महाराष्ट्र राज्य संघटनेचे पदाधिकारी यांच्या हस्ते त्यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला.

सर्वांगीण विकासासाठी केलेले प्रयत्न,पारदर्शक कारभार, महिला सक्षमीकरण, स्वच्छता अभियान, ग्रामनिधीतील कल्पनाबाबत दाखवलेले नेतृत्व या गुणांची दखल घेत हा पुरस्कार देण्यात आला आहे.यावेळी गावासाठी हा सन्मान अभिमानाचा क्षण असल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली. हा पुरस्कार माझा नसून संपूर्ण ग्रामपंचायतचा गावाचा असल्याचा भावना सरपंच पिंपरे यांनी व्यक्त केल्या.यावेळी सोमनाथ पिंपरे, नारायण गलांडे, नवनाथ भोसले उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button