Uncategorized
उद्या इंदापूर येथे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची आढावा बैठक; विधानसभा निवडणुकीनंतर प्रथमच पदाधिकारी कार्यकर्ते येणारे एकत्र.

विजय शिंदे
मंगळवार दिनांक २३ रोजी सकाळी ११ वाजता इंदापूर अर्बन बँक येथे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची आढावा बैठक आयोजित करण्यात आली आहे.
यावेळी राष्ट्रीय सहकारी साखर संघाचे अध्यक्ष माजी मंत्री हर्षवर्धन पाटील मार्गदर्शन करणार आहेत. या बैठकीसाठी विद्या प्रतिष्ठानचे खजिनदार योगेंद्र पवार, जिल्हाध्यक्ष जगन्नाथ शेवाळे उपस्थित राहणार असल्याची माहिती तालुकाध्यक्ष ॲड तेजसिंह पाटील यांनी दिली.
आगामी काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या दृष्टीने ही बैठक महत्त्वपूर्ण समजली जात आहे. विधानसभा निवडणुकीनंतर प्रथमच राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत एकत्रित बैठक घेण्यात येत आहे.



