Uncategorized

राष्ट्रवादीकडून वडापुरी– माळवाडी जिल्हा परिषद गटात धक्का तंत्र.?

विजय शिंदे

जिल्हा परिषद व पंचायत समित्यांसाठी दिवाळीपूर्वीच आचारसंहिता लागू होईल आणि दिवाळीनंतर नोव्हेंबरमध्ये निवडणूक होतील असे संकेत राज्य निवडणूक आयोगाने दिले आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर राज्य निवडणूक आयोगाने निवडणुकीबाबत तयारी सुरू केली आहे.

इंदापूर तालुक्यातील नव्याने गट गण रचनेत तयार झालेल्या वडापुरी माळवाडी जिल्हा परिषद गटात दोन राष्ट्रवादी व भारतीय जनता पक्षामध्ये चांगलीच चुरस पाहायला मिळणार आहे.

राष्ट्रवादीकडून इच्छुकांची संख्या अधिक असल्याने व विद्यमान पदाधिकाऱ्यांसह राज्य व जिल्हा पातळीवर काम करणारे तसेच प्रमुख पदाधिकारी या गटातून येत असल्याने कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांना उमेदवार निवडताना तारेवरची कसरत करावी लागणार आहे.

नव्या रचनेत तयार झालेल्या वडापुरी माळवाडी जिल्हा परिषद गटात माळवाडी गण वडापुरी गणाचा समावेश आहे यामध्ये माळवाडी गन हा कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या राष्ट्रवादीसाठी सोपा व मजबूत मानला जात आहे तर वडापुरी गण माजी मंत्री व राष्ट्रीय सहकारी साखर संघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांच्यासाठी सोपा व मजबूत मानला जात आहे. परंतु जिल्हा परिषदेचा उमेदवार निवडून आणताना दोघाही नेत्यांना जोर लावावा लागणार आहे यामध्ये भारतीय जनता पार्टीचे प्रवीण माने यांची भूमिका ही महत्त्वाची ठरणार आहे.

कृषिमंत्री दत्तात्रय भरणे हे राज्याचे नेतृत्व करत असताना इंदापूर तालुक्यातील पश्चिम भागाचा गाडा हे त्यांचे बंधू व कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मधुकर भरणे हे हाताळत असतात या गटात मधुकर भरणे यांना मानणारा तसेच संपर्कात असणारा मोठा वर्ग आहे. त्यामुळे माळवाडी वडापुरी गटात उमेदवारी मिळविण्यासाठी मधुकर भरणे यांची सहमती असणे आवश्यक असल्याचे बोलले जाते.

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उमेदवारांची स्पर्धा तीव्र आहे विद्यमान जिल्हा परिषद सदस्य अभिजीत तांबिले,पंचायत समितीचे सदस्य सतीश पांढरे हे जिल्हा परिषदेसाठी इच्छुक आहेत, पुन्हा एकदा काम करण्याची संधी मिळावी यासाठी ते प्रयत्न करत आहेत. त्याचबरोबर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस व प्रवक्ते शशिकांत तरंगे,पांडुरंग मारकड, नानासाहेब नरोटे, विष्णू पाटील, रवींद्र सरडे, सिताराम जानकर, विशाल मारकड, लक्ष्मण देवकाते,अतुल व्यवहारे, सरपंच दिलीप पाटील,बाळासाहेब व्यवहारे, सोमनाथ जावळे, दादासाहेब भोसले, धनंजय खराडे, शिवाजी तरंगे, सतीश चित्राव यासह अनेक जण इच्छुक आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेस मधील इच्छुकांची संख्या अधिक राहिल्यास पर्याय म्हणून कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या कुटुंबीयांपैकी नाव ऐनवेळी समोर येऊ शकते. विजयाचा मार्ग सुकर करण्यासाठी माळवाडी वडापुरी गटात प्रभाव असलेले बाजार समितीचे संचालक मधुकर भरणे यांच्या पत्नी शोभा भरणे,भगवानराव भरणे प्रतिष्ठानचे विश्वस्त अनिकेत भरणे व अनुष्का भरणे यापैकी उमेदवाराचा विचार करावा अशी मागणी काही कार्यकर्त्यांचा आग्रह आहे.

भगवानराव भरणे प्रतिष्ठानच्या माध्यमातून भरणे कुटुंबीय हे इंदापूर तालुक्यात कार्यरत आहेत, तालुक्यातील सामाजिक आरोग्य विषयक सेवांमध्ये भरणे प्रतिष्ठानच्या माध्यमातून मदत केली जाते, भरणे कुटुंबातील उमेदवार उभा केल्यास माळवाडी गणासोबतच वडापुरी गणातही जिल्हा परिषदेच्या उमेदवाराला फायदा होऊ शकतो अशी शक्यता वर्तवली जात आहे.

आरक्षण सोडतीनंतर जिल्हा परिषदेच्या व पंचायत समितीच्या उमेदवारीचा प्रश्न सुटणार असल्याचे बोलले जाते, परंतु तालुक्यातील सर्वच गट गणात राष्ट्रवादीकडे इच्छुकांची संख्या मात्र अधिक असणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button