माझ्या जीवाला धोका; अमोल इंगळे.
विजय शिंदे
माझ्या जीवाला बाभुळगाव ग्रामपंचायतचे सरपंच यांच्या पतीपासून धोका असून तालुक्यातील पोलीस प्रशासनाने याची दखल घ्यावी अशी मागणी बाभूळगाव येथील अमोल इंगळे यांनी केले आहे.
इंदापूर तालुक्यातील बाभूळगाव येथे नुकतीच ग्रामसभा पार पडली या ग्रामसभेवेळी अमोल इंगळे यांनी काही प्रश्न उपस्थित केले यावेळी सरपंच रेश्मा गुरगुडे यांचे पती सुखदेव गुरगुडे व अमोल इंगळे यांच्यात बाचाबाची झाली. या निमित्ताने आज शुक्रवार इंदापूर येथे (१९) अमोल इंगळे यांनी पत्रकार परिषद घेत ग्रामपंचायतच्या कारभारावर टीका केली आहे.
यावेळी बोलताना इंगळे म्हणाले मी शेतकरी आहे मला शेतीकामासाठी व अन्य व्यवसायाच्या निमित्ताने दिवस रात्र फिरावे लागते.मला ग्रामसभेत विचारलेल्या प्रश्नांचा राग धरून सरपंच यांच्या पतीपासून धोका आहे. तर पोलीस प्रशासनाने दखल घेऊन माझे बरे वाईट झाल्यास यांना जबाबदार धरावे अशी मागणी केली आहे.
यावेळी अमोल इंगळे यांच्यासोबत संजय देवकर, गणेश भोसले, महादेव मिसाळ, शरद उंबरे, शिवाजी देवकर, सागर आसबे, सतीश कवडे, मोहन वायकर, ज्ञानदेव भोसले, विवेक देवकर,प्रदीप टिपाले, विश्वास सूरवसे उपस्थित होते.यावेळी ग्रामपंचायतच्या कारभारावर भ्रष्टाचार तसेच दलित वस्ती व इतरही ठिकाणे निकृष्ट काम, सरपंचांच्या पतीचा हस्तक्षेप, खोट्या साह्यांचे अर्ज, घरकुलांसाठी पैसे घेतल्याचा, जलजीवन मध्ये घोटाळा तसेच इतरही कामात टक्केवारी घेतल्याचा आरोप करण्यात आला आहे. नुकत्याच झालेल्या ग्रामसभेला ग्रामसेवक रूपाली व्यवहारे या अनुपस्थित राहिल्या यामुळे सरपंच व ग्रामसभेला नियुक्त केलेले जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक यांना माहिती देता आली नाही, पुढील ग्रामसभेला ग्रामसेवक यांनी स्वतः उपस्थित राहावे अशी मागणी उपस्थित ग्रामस्थांनी केली.
यावेळी अमोल इंगळे म्हणाले नुकतीच झालेली ग्रामसभा तहकूब करण्यात आली असून शासकीय नियमानुसार लवकरच ग्रामसभा घेण्यात यावी यावेळी ग्रामस्थांना सर्व प्रश्नांची व केलेल्या कामांची उत्तरे द्यावीत.



