शहा येथे स्वच्छता अभियान.

विजय शिंदे
स्वच्छ भारत मिशन अंतर्गत महात्मा गांधी यांच्या जयंतीचे औचित्य साधून २ ऑक्टोबर हा दिवस ‘स्वच्छ भारत दिवस’ म्हणून साजरा करण्यात येणार आहे.त्याअनुषंगाने ‘स्वच्छता ही सेवा’ मोहीम १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत राबविली जात आहे. या मोहिमेचा एक महत्त्वपूर्ण टप्पा म्हणून इंदापूर तालुक्यातील शहा येथे महा स्वच्छता अभियान राबविण्यात आले.
यावेळी सरपंच दिलीप पाटील, ग्रामपंचायत अधिकारी संजीवनी मराळ, लहू निकम,अण्णासाहेब निकम, संतराम निकम, विजय पाटील, गावातील महिला तसेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील मुख्याध्यापक सर्व शिक्षक व ग्रामस्थांनी सहभाग नोंदवला.
गुरुवार (ता. २५) सकाळी ८ ते ११ या वेळेत ‘महास्वच्छता अभियान’ राबविण्यात आले.
‘एक दिवस, एक तास, एक साथ’ या संकल्पनेवर आधारित या देशव्यापी श्रमदान उपक्रमात ग्रामस्थांनी सहभाग नोंदवला.
गावातील मंदिर परिसर, बस स्टॅन्ड, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, व सार्वजनिक ठिकाणे या ठिकाणी स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.



