इंदापूर येथील प्रशासकीय भवनाला ‘राष्ट्रमाता जिजाऊ’ यांचे नाव देण्याची मागणी.

विजय शिंदे
इंदापूर येथील प्रशासकीय भवनाला ‘राष्ट्रमाता जिजाऊ’ यांचे नाव द्यावे, तसेच प्रशासकीय भवनाच्या प्रांगणात ‘जिजाऊ आणि बाल शिवाजी’ यांचे शिल्प उभारावे, अशी मागणी मराठा सेवा संघाच्या वतीने इंदापूर तहसीलदार यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.
याबाबत देण्यात आलेल्या निवेदनानुसार, विरश्री मालोजीराजे भोसले यांच्या पदस्पर्शाने पावन झालेला इंदापूर शहरातील प्रशासकीय भवनाला राष्ट्रमाता जिजाऊ यांचे नाव देऊन त्यांचा सन्मान वाढवावा. तसेच, प्रशासकीय भवनाच्या परिसरात राष्ट्रमाता जिजाऊ आणि बाल शिवाजी यांचे शिल्प उभारण्यात यावे, अशी मागणी मराठा सेवा संघ, जिजाऊ ब्रिगेड, संभाजी ब्रिगेड यांच्या वतीने निवेदन देत करण्यात आली.
यावेळी प्रा. जयश्री गटकूळ, कल्पना भोर, रतन पाडुळे, हेमलता बोंद्रे, स्वाती रणसिंग, ॲड पांडुरंग रायते, प्रमोद देशमुख, अमोल खराडे, प्रमोद जगताप, उदयसिंह भोसले, राहुल साळुंखे, तुषार घोगरे आदी उपस्थित होते.
या वेळी नायब तहसीलदार स्वाती राऊत यांनी निवेदन स्वीकारले.



