शनिवारी इंदापुरात श्री नारायणदास रामदास प्राथमिक विद्यामंदिर शाळेच्या विस्तारित इमारतीचा उद्घाटन समारंभ.

विजय शिंदे
इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळ संचलित श्री नारायणदास रामदास प्राथमिक विद्यामंदिर शाळेच्या विस्तारित इमारतीचा उद्घाटन समारंभ माजी मंत्री व राष्ट्रीय सहकारी साखर संघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांच्या शुभहस्ते उद्या (शनिवार १३) रोजी सकाळी ११ वाजता प्रशालेच्या प्रांगणात होणार आहे.
विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाची ओळख आहे. श्री नारायणदास रामदास प्राथमिक विद्यामंदिर इंदापूर येथे नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात येतात. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासासाठी इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाची महत्त्वाची भूमिका असून परिसरात शैक्षणिक कार्य उल्लेखनीय आहे.
नवीन इमारती मध्ये वर्गखोल्या, संगणक कक्ष, शिक्षक-कर्मचारी कक्ष, मुख्याध्यापक कक्ष तयार केला आहे. त्याचबरोबर मुला-मुलींसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह उपलब्ध आहेत.
या कार्यक्रमासाठी माजी मंत्री व संस्थेचे अध्यक्ष तसेच राष्ट्रीय सहकारी साखर संघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील व सर्व संचालक मंडळ, संस्थेचे सर्व पदाधिकारी उपस्थित राहणार असल्याची माहिती मुख्याध्यापिका सुप्रिया आगरखेड यांनी दिली.सदर कार्यक्रमासाठी विद्यार्थ्यांसोबतच पालकांनीही उपस्थित राहण्याचे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.



