Uncategorized

शिक्षक दिनाचे औचित्य साधून माजी विद्यार्थ्यांची इंदापूर शहरातील शाळेला मदत.

विजय शिंदे

इंदापूर येथील श्री नारायणदास रामदास हायस्कूलच्या 1996 च्या 10 वी मधील माजी विद्यार्थी समूहाने शहरातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा क्रमांक 4 व शाळा क्रमांक 6 चे नूतनीकरण करीत शाळेचे रूप बदलले. यामुळे शहरातील जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनाही चांगल्या शैक्षणिक परिसर निर्माण झाल्याने शिक्षक तसेच विद्यार्थ्यांनी आभार व्यक्त केले.


1996 च्या बॅचमधील माजी विद्यार्थ्यांकडून दरवर्षी शिक्षक दिनाच्या निमित्ताने वेगवेगळ्या शैक्षणिक व सामाजिक उपक्रमांचे आयोजन केले जाते त्या अनुरूप यावेळी शहरातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा क्रमांक चार व सहा येथे शाळेची सरक्षण भिंत बांधणे, पेव्हर ब्लॉक बसविणे, रंगकाम, बोलक्या भिंती अशी विविध कामे माजी विद्यार्थ्यांच्या माध्यमातून करण्यात आली.तसेच शिक्षक दिनाचे औचित्य साधून तत्कालीन आदरणीय गुरुजन सुभाष महाजन, बाबासाहेब घाडगे, जनार्दन देवकर, गोरक्षनाथ ठोंबरे, संजय सोरटे यांचा सत्कार करण्यात आला.


याबरोबरच इंदापूरचे केंद्रप्रमुख सिद्धार्थ चव्हाण, इंदापूर शिक्षक समितीचे अध्यक्ष सुनील शिंदे, शाळा शिक्षण व्यवस्थापन समितीचे सदस्य माजी नगरसेवक कैलास कदम यासह नासा भेटीसाठी निवड झालेल्या गुणवंत विद्यार्थी मोहम्मद ओमर शेख यांचाही गौरव करण्यात आला तर कास्ट्राईब शिक्षक संघटनेचे अध्यक्ष सुहास मोरे, शिक्षक भारती संघटनेचे अध्यक्ष सतीश शिंदे, शिक्षक सोसायटीचे माजी चेअरमन शशिकांत शेंडे, दत्तात्रय ठोंबरे, पुणे जिल्हा शिक्षक सोसायटीचे सचिव शहाजी पोफळे, पारेकर वस्ती शाळेचे मुख्याध्यापक संतोष घोडके, तोबरे वस्ती शाळेचे शिक्षक वामनराव गायकवाड, सुगाव शाळेचे मुख्याध्यापक बापू आदलिंग, इंदापूर शाळा नंबर 5 च्या मुख्याध्यापिका सुलताना मोमीन, आर .के .शहा शाळेचे मुख्याध्यापक जगदाळे,साळवे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष गौरी मखरे, नारायणदास रामदास प्राथमिक विद्यालय मुख्याध्यापिका सुप्रिया आगरखेड, इंदापूर शाळा नंबर 4 शाळेचे मुख्याध्यापक वासुदेव पालवे, सहशिक्षक विकास घुगे, वैजयंता घुगे , इंदापूर नंबर 6 शाळेचे मुख्याध्यापक विलास शिंदे, सहशिक्षक सुरेश लोंढे याचाही सन्मान करण्यात आला.


हा कार्यक्रम यशस्वीतेसाठी 1996 च्या 10 वीच्या बॅचचे नितीन शहा, उदय शहा, अमर गायकवाड, भीमाशंकर जाधव, प्रशांत घुले, बाळासाहेब म्हेत्रे, मनीषा पाटील, स्वाती लोंढे, सुहास राऊत, मनोज मोरे, सचिन शेंडे, अविनाश बनकर, पराग भाग्यवंत, दीपक घोडके यांनी प्रयत्न केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button