Uncategorized

इंदापूर तालुक्यातील रोजगार हमी कामांचे सामाजिक अंकेक्षण व जनसूनावणी संपन्न.

विजय शिंदे

महाराष्ट्र राज्य सामाजिक अंकेक्षण व पारदर्शकता सोसायटी,मंत्रालय-मुंबई यांचे वतीने इंदापूर तालुक्यातील 116 ग्रामपंचायत अंतर्गत महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी अधिनियम-2005च्या आर्थिक वर्ष 2024-25 मधील कामांची सामाजिक अंकेक्षण प्रक्रिया पूर्ण झाली असून तालुकास्तरीय जनसुनावणी पंचायत समिती सभागृह,इंदापूर येथे संपन्न झाली.

जनसुनावणीचा शुभारंभ गटविकास अधिकारी सचिन खुडे,सहा.गट विकास अधिकारी संजय जगताप,विस्तार अधिकारी संजय मारकड,भिवाजी काळे, अजित घोगरे सो.जिल्हा साधन व्यक्ती,सामाजिक अंकेक्षन व पारदर्शकता सोसायटी,मंत्रालय-मुंबई किरण भांगे यांचे उपस्थित करण्यात आला.पॅनलवर तालुका विधी सेवा प्राधिकरण प्रतिनिधी ॲड.बिरुदेव घोगरे,पत्रकार प्रतिनिधी सलीम शेख,एनजीओ.प्रतिनिधी तथा रोटरी क्लब अध्यक्ष नरेंद्र गांधी,मजूर प्रतिनिधी हरिदास चितळकर इ.उपस्थित होते.

यावेळी ग्रामसेवक,रोजगार सेवक,कृषी सहाय्यक इ.सह विविध यंत्रणेचे अधिकारी उपस्थित होते. ग्रामरोजगार सेवक संघटनेतर्फे दि.३ ऑक्टोंबर २०२४ च्या शासन निर्णयानुसार नुसार ग्रामरोजगार सहायकांचे मानधन सुरू करण्यात यावे,अशा मागणीचे निवेदन जिल्हा साधन व्यक्ती भांगे यांना देण्यात आले.

या जनसुनावणी यशस्वी करण्यासाठी यशस्वी पार पाडण्यासाठी विनोद शिद,एपीओ अमोल माने,प्रदीप कदम,राम रोकडे,दिग्विजय माकोडे,नेहा भोसले इ.यांनी परिश्रम घेतले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button