Uncategorized

गौरी सजावट स्पर्धेचे आयोजन..

विजय शिंदे

इंदापूर तालुक्यातील भाटनिमगाव येथील श्री शिवाजी सार्वजनिक वाचनालय यांच्या वतीने गौरी सजावट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

हे स्पर्धेचे दुसरे वर्ष असून प्रथम विजेत्यास पैठणी, द्वितीय विजेत्यास कुकर, तृतीय स्पर्धकास पूजेचे ताट, उत्तेजनार्थ विजेत्यास आकर्षक भेटवस्तू तसेच सहभागी स्पर्धकांनाही भेटवस्तू दिली जाणार आहे.

या स्पर्धेसाठी गौरी सजावटीचे फोटो व दोन मिनिटांचा व्हिडिओ ९६६५४००३०१ या क्रमांकावरती व्हाट्सअप करायचा आहे. विजेत्यांची नावे जाहीर झाल्यानंतर बक्षीस वितरण घरपोच केले जाणार असल्याचे श्री शिवाजी सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष स्पर्धेचे संयोजक विजय शिंदे यांनी सांगितले.

या स्पर्धेसाठी विजेत्यांना बक्षीस इंदापूर पंचायत समितीचे सदस्य सतीश पांढरे, शहा गावचे सरपंच दिलीप पाटील, कर्मयोगी कारखान्याचे संचालक रवींद्र सरडे व ज्येष्ठ संचालक हनुमंत जाधव तसेच काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी निवास शेळके यांच्यावतीने देण्यात येणार आहेत.

रविवार दिनांक ३१ ऑगस्ट पासून मंगळवार दिनांक २ सप्टेंबर पर्यंत फोटो व व्हिडिओ पाठवायचे आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button