Uncategorized

इंदापुरात महायुतींच्या नेत्यांसोबत खासदार सुप्रिया सुळे यांचाही फोटो.

विजय शिंदे

भारतीय कृत्रिम अंग निर्माण निगम व कै भगवानराव भरणे प्रतिष्ठान यांच्यावतीने इंदापूर येथे आयोजित केलेल्या दिव्यांग व वयोश्री योजनेतील लाभार्थ्यांसाठी मोफत तपासणी शिबिराच्या बॅनर वरती बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे यांचाही फोटो वापरण्यात आल्याने आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी दोन राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या चर्चेला सुरुवात झाली आहे.

Oplus_16908288

राष्ट्रवादीत फूट झाल्यानंतर शरद पवार व अजित पवार यांचे दोन वेगळे पक्ष तयार झाले, मूळ पक्ष उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे गेला यावेळी इंदापूर तालुक्यात तत्कालीन विद्यमान आमदार व राज्याचे विद्यमान कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी अजित पवार यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला होता. तेव्हापासून सुप्रिया सुळे व शरद पवार यांचा फोटो बॅनर वरती गायब झाला होता.

शिबिराच्या निमित्ताने पुन्हा एकदा एकाच बॅनर वरती महायुतीच्या नेत्यांसोबतच सुप्रिया सुळे व कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांचा फोटो आल्याने भरणे व खासदार सुळे यांच्यात लोकसभेवेळी वाढलेली राजकीय दरी कमी होत असल्याची चर्चा सुरू आहे.

या शिबिराच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, एकनाथ शिंदे यांच्यासोबत महायुतीतील नेत्यांचे फोटो आहेत यामध्ये केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, खासदार सुप्रिया सुळे, खा सुनेत्रा पवार, मंत्री संजय शिरसाट यांचे फोटो आहेत.

शिबिरामध्ये राष्ट्रीय वयोश्री अंतर्गत ज्येष्ठ नागरिक व दिव्यांगांसाठी साहित्य मिळणार आहे. यासाठी शनिवार दिनांक ३० ऑगस्ट रोजी शहा सांस्कृतिक भवन इंदापूर तर ३१ ऑगस्ट रोजी अतिथी मंगल कार्यालय अथुर्णे येथे कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button