Uncategorized

माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त स्वराज प्रतिष्ठान तर्फे वृक्षारोपण.

विजय शिंदे

इंदापूर येथील राजेंद्र हौसिंग सोसायटी व स्वराज नगर परिसरात माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांचे वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण करण्यात आले. 

या कार्यक्रमाचे आयोजन स्वराज प्रतिष्ठान चे अध्यक्ष व इंदापूर अर्बन बँकेचे संचालक स्वप्नील सावंत यांनी केले होते. 

या वेळी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते वृक्षारोपण व दत्त मंदिरात आरती व पूजा करण्यात आली. तसेच या परिसरातील ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते विविध फळांची व फुलांची झाडांचे वृक्षारोपण झाले.

 स्वप्निल सावंत यांच्यातर्फे ज्येष्ठ नागरिकांना बसण्यासाठी दत्त मंदिराच्या आवारात सिमेंटचे बाक देण्यात आले
 यावेळी हर्षवर्धन पाटील यांचा सत्कार परिसरातील सर्व नागरिकांच्या हस्ते करण्यात आला.

 याप्रसंगी राजेंद्र हौसिंग सोसायटीचे सचिव बुवासाहेब निकम, अर्जुन काळे, नितीन सरडे, अमृत शहा, सागर गांधी, राजेंद्र जाधव, कदीर भाई पठाण, संतोष होगले, महेंद्र खाडे, प्रशांत गावडे, अशोक खेडकर , नानासाहेब सावंत , दिगंबर बिरादार , एडवोकेट रणजीत चौधरी , एडवोकेट शितोळे , आधी या परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित होते .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button