हा निर्णय राज्यातील १४ कोटी जनतेसाठीही सुखद; चंद्रशेखर वढणे
विजय शिंदे (इंदापूर)
छत्रपती शिवाजी महाराजांची प्रथम राजधानी, राजगड किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या पुणे जिल्ह्यातील वेल्हे तालुक्याचे नामकरण राज्य सरकारने ” राजगड” असे केले आहे. याबाबतचा निर्णय महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज जाहीर केला.
निर्णय जाहीर होताच वेल्हे राजगड येथे भाजपा च्या वतीने जल्लोष करण्यात आला पेढे भरवत, फटाक्याची आतषबाजी करत भारतीय जनता पार्टी दक्षिणचे जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर वढणे यांनी भाजप पदाधिकारी कार्यकर्त्यांसह एकच जल्लोष केला. छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय या घोषणांनी परिसर दणाणून गेला.
राजगड तालुका भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष राजाभाऊ रेणुसे यांच्या पुढाकाराने वेल्हे पंचायत समिती आवारातील छत्रपती शिवाजी महाराज व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास यावेळी अभिवादन करण्यात आले.
यावेळी जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर वढणे म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, उच्च व तंत्र शिक्षण तसेच पुणे जिल्ह्याचे संपर्क मंत्री चंद्रकांत पाटील, केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, माजी आमदार संग्राम थोपटे यांच्या पुढाकाराने नामकरणाचा निर्णय घेतला असून त्यांचे भारतीय जनता पार्टीच्या वतीने, राज्यातील जनतेच्या वतीने मनापासून आभार मानतो. ऐतिहासिक वारश्याशीसंबंधीत हा निर्णय राज्यातील १४ कोटी जनतेसाठीही सुखद आहे.
या निर्णयामुळे राजगड किल्ल्याचे ऐतिहासिक आणि पर्यटनाचे महत्त्व आणखी अधोरेखित होणार आहे. इतिहासप्रेमी आणि पर्यटक या ठिकाणी अधिक आकर्षित होतील अशी अपेक्षा आहे. पर्यटनवाढीसोबतच स्थानिकांना रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होऊ शकतात.
स्थानिक नागरिकांसाठी हा निर्णय अभिमानाचा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाशी थेट जोडले गेलेले ‘राजगड’ नाव तालुक्याला मिळाल्याने अनेक पिढ्यांना आपल्या इतिहासाची नव्याने ओळख होणार आहे. गावोगावी साजरा होणारा शिवजयंती उत्सव आणि राजगडच्या स्मृती आता तालुक्याच्या नावामुळे अधिक भव्यतेने अनुभवता येतील.
या वेळी वरिष्ठ उपाध्यक्ष बाळासाहेब गरुड यांनी मार्गदर्शन केले, सुनील जागडे जिल्हाध्यक्ष अभियंता आघाडी यांनी आभार मानले.
या वेळी राज्य परिषद सदस्य बाळासाहेब गरुड, वैशालीताई सणस, जिल्हा नियोजन मंडळ सदस्य जीवन कोंडे, माजी जि प सदस्य व जिल्हा उपाध्यक्ष आनंद देशमाने, राजगड तालुका भाजपा अध्यक्ष राजाभाऊ रेणुसे, जिल्हा सरचिटणीस आकाश कांबळे, चिटणीस सुनील जागडे, माजी जिल्हा परिषद सदस्य विनायक ठोंबरे, भोर भाजपा अध्यक्ष संतोष धावले ,भाजपा शहराध्यक्ष पल्लवीताई फडणवीस, ज्येष्ठ सदस्य भाजपा अशोक वाडकर, सरचिटणीस भोर भाग्यश्री साठे, माजी अध्यक्ष राजाभाऊ गुरव, सुषमाताई जागडे चिटणीस, भाजपा युवा मोर्चा जिल्हा चिटणीस शुभम बेलदरे, आबा जांजले सरचिटणीस भोर, माऊली पांगारकर अध्यक्ष कामगार आघाडी, विशाल वालगुडे उपाध्यक्ष भाजपा राजगड, भगवान गरुड सदस्य भाजपा, मंगेश कुंभार सदस्य भाजपा, वर्षाताई सातव महिला अध्यक्ष मुळशी, कोमल शेलार सरचिटणीस मुळशी, निलेश कोंडे जिल्हा संयोजक सोशल मीडिया हे मान्यवर उपस्थित होते.



