Uncategorized

वडापुरी गावावरती शोककळा;कालव्यात चार चाकी पडून झालेल्या अपघातात दोघांचा मृत्यू.

विजय शिंदे

वडापुरी (ता.इंदापूर) येथील दोघांचा कुर्डूवाडी-टेंभुर्णी रोडवर पिंपळनेरजवळ असलेल्या कालव्यात चार चाकी पडून झालेल्या अपघातात मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.शंकर उत्तम बंडगर व अनिल हनुमंत जगताप (तोबरे) असे अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांची नावे आहेत.

याबाबत सुरेश राजाराम जाधव (वय 49 वर्षे, रा. वडापुरी ता.इंदापूर) यांनी कुर्डूवाडी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार गुरुवार (ता.21) रोजी फिर्यादी व त्यांच्या गावातील शंकर उत्तम बंडगर (वय 44 वर्षे) व अनिल हनुमंत जगताप (वय 55 वर्षे) असे तिघे जण चारचाकी वाहन (क्रमांक MH42 BE 8954) मधून धाराशीव येथून वडापुरी ता.इंदापूर कडे परतत हाेते.

सोलापूर जिल्ह्यातील कुर्डूवाडी-टेंभुर्णी मार्गावर पिंपळनेर लगत चालक बंडगर यांचा वाहनावरील ताबा सुटल्याने वाहन लगतच्या असलेल्या कॅनॉलला लावलेल्या लोखंडी गार्डला घासुन कैनलमध्ये पडली. त्यावेळी फिर्यादी हे गाडीचा साईडचा दरवाजा उघडुन गाडीतून कसेबसे बाहेर आलो आले.यावेळी गाडीचे इतर दरवाजे लॉक झाल्याने इतर दोघांना बाहेर पडणे शक्य झाले नाही.यामध्ये बराच वेळ गेला.त्यानंतर स्थानिकांच्या मदतीने ट्रॅक्टरने ओढुन गाडी बाहेर काढली यावेळी गाडीत असलेलं शंकर उत्तम बंडगर, अनिल हनुमंत जगताप यांना कुर्डवाडी येथील दवाखान्यात दाखल केले असता उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी जाहीर केले.

दरम्यान या दुर्दैवी घटनेमुळे वडापुरी (ता. इंदापूर) गावावरती शोककळा पसरली असून एकाच गाडीतून प्रवास करत असलेले तिघेही जिवलग मित्र होते. त्यातील दोघांचा मृत्यू झाल्याने गावकऱ्यांनी गावातील सर्व व्यवहार बंद ठेवत शोक व्यक्त केला

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button