Uncategorized

प्रगती साठी, सुरक्षेसाठी, सन्मानासाठी आमचा “देवाभाऊ” भाटनिमगाव गावातील दोनशे लाडक्या बहिणी मुख्यमंत्र्यांना पत्राद्वारे राखी पाठवणार.!!

विजय शिंदे

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भाटनिमगाव येथून पत्राद्वारे रक्षाबंधन..

भावंडांच्या प्रेमाचा सण रक्षाबंधन देशभरात साजरा करण्यात आला. श्रावण पौर्णिमेला साजरा होणाऱ्या या सणाला हिंदू धर्मात विशेष महत्त्व आहे.या दिवशी बहीण भावाच्या मनगटावर राखी बांधून त्याच्या दीर्घायुष्य, आरोग्य आणि सुख-समृद्धीची प्रार्थना करते.

इंदापूर तालुक्यातील भाटनिमगाव या गावातील दोनशे लाडक्या बहिणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्राद्वारे राखी पाठवणार आहेत अशी माहिती इंदापूर तालुका भारतीय जनता पार्टीचे चिटणीस गणेश पोळ व युवा मोर्चाचे पदाधिकारी आनंद शिंदे, बूथ कमिटी चे सदस्य अनिल पवार यांनी दिली.

Oplus_16908288

प्रगती साठी, सुरक्षेसाठी, सन्मानासाठी आमचा “देवाभाऊ” या आशय असलेले कार्ड मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठवले जाणार असून यामध्ये राखी तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार व्यक्त करणारे पत्र पाठवले आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकार मध्ये महिलांसाठी अनेक योजना राबविल्या जात आहेत यामध्ये नमो ड्रोन दीदी योजना, लखपती दीदी योजना, मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना, महिला सन्मान योजना, सुकन्या समृद्धी योजना, लेक लाडकी योजना, बीबी केअर किट योजना, माझी कन्या भाग्यश्री योजना आदी योजना चा समावेश आहे.

इंदापूर तालुक्यातील महिलाही यामध्ये सहभागी होणार

महाराष्ट्रात लाडकी बहीण योजना आल्याने अनेक महिलांना संसारात मदत झाली असून या माध्यमातून छोटे व्यवसाय उभी करण्याची संधी उपलब्ध झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना महाराष्ट्रातून महिला राख्या पाठवत असून इंदापूर तालुक्यातील महिलाही यामध्ये सहभागी होणार आहेत.

राम आसबे
अध्यक्ष भारतीय जनता पक्ष इंदापूर तालुका (पूर्व मंडल)

आपल्या बहिणी आपल्या पाठीशी

आजच्या काळातील स्त्री, बहिण, मुलगी या सर्वजणी सक्षम असून त्या समाजात सकारात्मक ऊर्जा पसरविण्याचे काम करत आहेत. आपल्या बहिणी आपल्या पाठीशी आहेत आणि राज्याच्या विकासात त्या सोबतही आहेत, मुख्यमंत्री म्हणून लाडक्या बहिणींच्या आयुष्यात असणारे तुमचे काम कौतुकास्पद असून नारीशक्तीला आणखी बळ मिळावे, यासाठी आपण प्रयत्नशील आहेत याचा आम्हाला अभिमान वाटतो.

सुनीता सुरेश भोसले

मुख्यमंत्री लाडकी बहीण

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button