विद्यार्थ्यांनी आपल्या आई-वडिलांनी केलेल्या कष्टाचे मोल जपावे.

विजय शिंदे
शिक्षण हे काळानुसार बदलणे गरजेचे आहे. आजच्या काळात जास्त नोकऱ्या निर्माण करणाऱ्यांची गरज असून विद्यार्थ्यांनी मित्रांचे एक जाळे तयार करावे, जास्त अभ्यास करून आपल्या आई-वडिलांनी केलेल्या कष्टाचे मोल जपावे असे आवाहन श्री नारायणदास रामदास ट्रस्टचे प्रमुख मुकुंदशेठ शहा व भरतशेठ शहा यांनी केले.
इंदापूर शहर व परिसरातील ३ हजार विद्यार्थ्यांना स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने मोफत शालेय गणवेश वाटप शहा कुटुंब यांच्यावतीने करण्यात आले यावेळी ते बोलत होते.
शहा परिवाराने गेली ४० हून अधिक वर्षाची परंपरा जपली असून स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने इंदापूर तालुक्यातील दादासाहेब पाटील विद्यालय, कांदलगाव,राधिका विद्यालय इंदापूर, हनुमान विद्यालय अवसरी,श्रीनाथ विद्यालय वडापुरी,
मूक बधिर व मतिमंद शाळा, इंदापूर
न्यू इंग्लिश स्कूल, इंदापूर
तरंगवाडी विद्यालय
आश्रम शाळा, इंदापूर
कळाशी विद्यालय यांना मोफत गणवेश दिले आहेत.
चालू वर्षी इंदापूर परिसरातील सुमारे ३००० विद्यार्थ्यांना गणवेश वाटप
ही सेवा कार्याची सुरुवात श्री नारायणदास (बप्पा) शहा शेटजी, गोकुलदास (भाई) शहा (शेटजी) सुरेशदास (काका) शहा शेटजी यांनी केली आणि आता ती परंपरा मुकुंदशेठ शहा व भरतशेठ शहा यांनी जपली आहे.
यावेळी बोलताना मुकुंदशेठ शहा व भरतशेठ म्हणाले “विद्यार्थ्यांचं स्वप्न मोठं असावं,,‘‘विद्यार्थ्यांनी ‘कम्फर्ट झोन’मधून बाहेर यावे. ज्ञान मिळविण्यासाठी नेहमी प्रयत्न केला पाहिजे. अभ्यासक्रमाव्यतिरिक्त ज्ञानार्जन करा. अपयश हा यशाचा भाग आहे, अपयशाने खचू नका.



