Uncategorized

वडापुरी– माळवाडी ’साठी इच्छुकांची मांदियाळी; आरक्षण सोडती नंतर चित्र होणार स्पष्ट.!!

विजय शिंदे.

पुणे जिल्हा परिषद व इंदापूर पंचायत समिती पंचवार्षिक निवडणुकीसाठी गट गण रचनेचा आराखडा प्रसिद्ध करण्यात आला आहे. पूर्वीच्या अनेक गटात बदल करण्यात आल्याने इच्छुक उमेदवारांची मात्र चांगलीच तारांबळ उडाली आहे. कही खुशी कही गम अशी अवस्था इच्छुक उमेदवारांची झाली आहे. आरक्षण सोडती नंतरच गट गणातील चित्र अधिक स्पष्ट होणार असल्याने गाव गावच्या पारा पारावर आराखडे बांधत संभाव्य उमेदवारांची चर्चा मात्र रंगली आहे.

पूर्वीचा काटी वडापुरी जिल्हा परिषद गटात मोठ्या प्रमाणात बदल करण्यात आला असून माळवाडी हा नवीन गण वडापुरी गणाला जोडला आहे. यामध्ये पूर्वीच्या काटी गणातील तरंगवाडी गोखळी ही दोन गावे माळवाडी गणाला जोडली असून वडापुरी गणातील शहा व सरडेवाडी हे गावे माळवाडी गणात जोडली आहेत. तर बावडा गणातील भांडगाव हे गाव वडापुरी गणात जोडले गेले आहे.

यामध्ये वडापुरी गणात माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांचे प्राबल्य दिसून येत असून पाठीमागच्या वीस वर्षातील मतांच्या आकडेवारीवरून वडापुरी गणातील सर्वच गावात पाटील यांचा प्रभाव असल्याचे दिसून येत आहे. तर माळवाडी गणात क्रीडामंत्री दत्तात्रय भरणे यांचे प्राबल्य दिसून येत आहे हमखास मतदान देणारी शहा व तरंगवाडी, गोखळी ही गावे माळवाडी गणाला जोडल्याने माळवाडी गण हा मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या उमेदवारासाठी सुलभ झाल्याचे दिसून येत आहे, तर भारतीय जनता पार्टीचे युवा नेते प्रवीण माने यांच्या बिजवडी गणातील काही गावे माळवाडी गणात असल्याने त्यांचाही अधिक प्रभाव दिसून येणार आहे.

माजी मंत्री हर्षवर्धन पाटील हे भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरू आहे. तसे झाल्यास इंदापूर तालुक्यात भारतीय जनता पार्टीची ताकद आणखी वाढणार आहे. पाटील व माने एकत्र आल्यास वडापुरी माळवाडी गटातही त्याचा परिणाम दिसून येणार आहे.

माळवाडी गणातून

राष्ट्रवादी पक्षाकडून नानासाहेब नरुटे, विष्णू पाटील,सरडेवाडीचे माजी सरपंच सिताराम जानकर, अतुल व्यवहारे, अशोक चोरमले, शहा गावचे दिलीप पाटील, सतीश चित्राव,सचिन खामगळ, आप्पासाहेब माने, सचिन चव्हाण, हनुमंत जमदाडे, विठ्ठल महाडिक आदी इच्छुक आहेत, तर भारतीय जनता पार्टी कडून माऊली वाघमोडे सह अन्य कार्यकर्ते इच्छुक आहेत.

हर्षवर्धन पाटील गटाकडून महेंद्र रेडके, राजेंद्र चोरमले, कुबेर पवार, सुभाष बोंगाणे, दत्तात्रय पांढरे,अतुल ढावरे, विजय (मामा) शिद, सचिन सरडे, सागर पेटकर, आदी इच्छुक आहेत.

वडापुरी गणातून माजी मंत्री हर्षवर्धन पाटील गटाकडून गोपीचंद गलांडे, अमोल इंगळे, मोहन खबाले, अजित खबाले, महेश शिर्के, रमेश देवकर, दादासाहेब तोबरे, सुभाष गायकवाड आदी इच्छुक आहेत.

तर राष्ट्रवादी पक्षाकडून भागवत काटकर, पंजाबराव गायकवाड, नागनाथ शिंदे,सोमनाथ जावळे, मनोहर भोसले, बिबीशन देवकर,धनंजय खराडे, शिवाजी तरंगे, नानासाहेब भोसले इच्छुक आहेत.

तर माळवाडी— वडापुरी जिल्हा परिषद गटासाठी राष्ट्रवादीकडून शशिकांत तरंगे, सतीश पांढरे, अभिजीत तांबिले, पांडुरंग (तात्या) मारकड, रवींद्रशेठ सरडे,विष्णू पाटील, विशाल मारकड,लक्ष्मण देवकाते इच्छुक आहेत.तर हर्षवर्धन पाटील यांच्या गटाकडून ऋतुजाताई पाटील,महेंद्र रेडके, राजेंद्र चोरमले, अमोल चंदनशिवे, अमोल इंगळे हे इच्छुक आहेत तर ऐनवेळी अंकिताताई पाटील किंवा राजवर्धन पाटील यांच्या नावाचाही कार्यकर्त्यांकडून आग्रह होऊ शकतो.भारतीय जनता पार्टी कडून मंडल अध्यक्ष राम आसबे यांना संधी मिळू शकते.
तर महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष संजय सोनवणे यांची भुमिकाही निर्णायक ठरणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button