आरक्षण सोडती आधीच पळसदेव–बिजवडी गटातून दीपक जाधव यांच्या उमेदवारीची मागणी. राष्ट्रवादीची युवा फळी लागली कामाला.?
विजय शिंदे.
गेल्या तीन वर्षापासून प्रलंबित असलेल्या पुणे जिल्हा परिषदेची व इंदापूर पंचायत समितीची गट गण रचना जाहीर झाली आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवार व त्यांच्या समर्थक कामाला लागले आहेत. आपल्याच नेत्याला जिल्हा परिषद पंचायत समितीची उमेदवारी कशी मिळेल याकडे सर्वांचे लक्ष आहे.
नुकतीच इंदापूर तालुक्यातील जिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती गणांची रचना जाहीर झाली असून त्यानंतर आता खऱ्या अर्थाने निवडणुकीसाठी इच्छुक असणारे तयारीला लागल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे.
या निवडणुकीत अनेक युवा चेहऱ्यांकडे मतदारांचे लक्ष लागलेले असताना दीपक जाधव यांनाच दत्तात्रय भरणे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस कडून पळसदेव बिजवडी जिल्हा परिषद गटात निवडणुकीच्या आखाड्यात उतरवावं अशी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेस बारामती लोकसभा अध्यक्ष प्रशांत गलांडे पाटील यांनी केली आहे.
यावेळी बोलताना गलांडे पाटील म्हणाले की २०१७ साली दीपक जाधव यांनी काँग्रेसच्या चिन्हावर पुणे जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम आरोग्य सभापती प्रवीण माने यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती. त्यावेळी अल्प मताधिक्याने जाधव यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. यानंतर २०२२ मध्ये दीपक जाधव यांनी हर्षवर्धन पाटील यांना रामराम ठोकत तत्कालीन राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे यांची साथ दिली.
२०२४ च्या झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत हर्षवर्धन पाटील यांचा हक्काचा मतदारसंघ समजल्या जाणाऱ्या आणि कर्मयोगी कारखान्याचे कार्यक्षेत्र असणाऱ्या पळसदेव बिजवडी गटात मोठं मताधिक्य मंत्री भरणे यांना मिळालं. यात दीपक जाधव यांच्या माध्यमातून तरुणाईची मोठी फळी भरणे यांच्या पाठीशी उभा राहिली.
नव्यानेच पक्षात आलेली दीपक जाधव आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे जुने कार्यकर्ते यांनी हातात हात घालून काम केलं आणि मोठ्या मताधिक्याने भरणे यांना तिसऱ्यांदा विधिमंडळात पाठवलं. विधानसभेच्या निवडणुकीनंतर आता जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांसाठी राजकारण तापलं असून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून मंत्री भरणे यांनी पळसदेव बिजवडी गटासाठी दीपक जाधव यांना निवडणुकीच्या आखाड्यात उतरवावे.
२०१७ साली दीपक जाधव यांनी काँग्रेस मधून निवडणूक लढवली होती, त्यावेळी माने यांच्या विरोधात दीपक जाधव यांची ताकद थोडी कमी पडली. पळसदेव बिजवडी गटात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची मोठी ताकद असून दीपक जाधव यांचा चेहरा मतदारांच्या पसंतीचा असल्याने संपूर्ण ताकद दीपक जाधव यांच्या पाठीशी उभा राहील. त्यामुळे या गटातून दीपक जाधव यांचा विजय निश्चित आहे.
कोण आहेत दीपक जाधव ?
वयाच्या अठराव्या वर्षापासून गलांडवाडी नरुटवाडी ग्रुप ग्रामपंचायतवर वर्चस्व.
2006 साली राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष
2011 साली इंदापूर तालुका युवक काँग्रेस अध्यक्ष पदाची धुरा
2017 पुणे जिल्हा परिषदेसाठी प्रवीण माने यांच्या विरोधात निवडणूक लढवली.
2017 साली जिल्हा परिषद निवडणुकीत अल्पमताने पराभव.
2019 साली काँग्रेस मधून हर्षवर्धन पाटील यांच्याबरोबर भाजपामध्ये प्रवेश.
3 एप्रिल 2022 साली भाजपा मधून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश.
युवा चेहरा म्हणून इंदापूरच्या राजकारणात नवलौखिक.
अल्पावधीत युवकांचे मोठा संघटन.
होणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकीत पळसदेव बिजवडी जिल्हा परिषद गटातून दावेदार.
जिल्हा परिषद आणि पंचायत समिती साठी अनेक प्रभावी चेहरे…
दीपक जाधव, बाळासाहेब काळे, कालिदास देवकर, डी एन जगताप, पै. हिराचंद उर्फ पिंटू काळे, हनुमंत जाधव, भूषण काळे, महारुद्र पाटील, भाजपचे आकाश कांबळे.मेघराज पाटील, संग्रामसिंह देशमुख, ज्ञानेश्वर बनकर,सागर बनकर, प्रशांत सूर्यवंशी, दादा वीर, नारायण वीर यांसह इतर ही अनेक प्रभावी चेहरे पळसदेव बिजवडी जिल्हा परिषद गटात आहेत.
सध्या केवळ जिल्हा परिषद गटाची आणि पंचायत समिती गणाची रचना जाहीर झाली आहे. यानंतर हा जिल्हा परिषद गट कोणत्या प्रवर्गासाठी आरक्षित होतो यावरती उमेदवार ठरणार आहेत. त्यामुळे राजकारणातील प्रमुख पक्ष कोणते उमेदवार देतात आणि कोण कोणाच्या विरोधात निवडणुकीच्या आखाड्यात उतरतो ते पाहण महत्त्वाच असेल.
पळसदेव बिजवडी गटात या गावांचा समावेश…
पळसदेव गण : डाळज नं. १, डाळज नं.२, डाळज नं. ३, पळसदेव, काळेवाडी, माळेवाडी, बांडेवाडी, न्हावी, भादलवाडी, बळपूडी, कौठळी, भावडी
बिजवडी गण : चांडगांव, गलांडवाडी १, नरुटवाडी, वरखुटे बु., करेवाडी, लोणी देवकर,बिजवडी, वनगळी, राजवडी, गागरगाव, पोंदकुलवाडी, गंगावळण, कळाशी, अगोती १, अगोती २, कालठण



