Uncategorized
शहा जिल्हा परिषद शाळेचा विद्यार्थी उमर शेख जिल्हा गुणवत्ता यादीत.

विजय शिंदे
इंदापूर – शहा,ता.इंदापूर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचा विद्यार्थी मोहंमदउमर समीर शेख याने इयत्ता पाचवी मध्ये घेण्यात आलेल्या शिष्यवृत्ती परीक्षेत जिल्हा गुणवत्ता यादीत २५६ गुण मिळवून यश संपादन केले आहे.
यावेळी सरपंच दिलीप पाटील,शाळेचे मुख्याध्यापक ए.एस.शिंदे,शाळा व्यवस्थापन समिती व ग्रामस्थांकडून त्याने मिळवलेल्या यशाबद्दल कौतुक व अभिनंदन केले जात आहे.वर्गशिक्षक जी.पी.मोरे, सहशिक्षिका एस.एस.शिंदे,एम.वाय.मोमीन,इ.एच.मोमीन यांनी मोहंमदउमर समीर शेख यांस मार्गदर्शन केले.



