इंदापूर तालुक्यातील गट गण रचना जाहीर; अनेक इच्छुकांच्या गणाचे घुंगरू हरवले.

विजय शिंदे.
इंदापूर तालुक्याचे लक्ष लागून राहिलेले ८ जिल्हा परिषद गट व १६ पंचायत समिती गणाची गट गण रचना आज जाहीर झाली आहे,पुणे जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी सोमवारी (दि. १४) ही गट व गण रचना जाहीर केली आहे.
इंदापूर तालुक्यात यापूर्वी जिल्हा परिषदेचे सात गट तर पंचायत समितीचे १४ गण होते. यामध्ये एका गटाची वाढ होऊन ते आठ तर पंचायत समितीचे १४ चे १६ गण तयार झाले आहेत.
जुन्या गटातील गावे नवीन गटाला जोडली गेल्याने अनेक विद्यमान सदस्यांची निराशा झाली आहे. गेली अनेक दिवस निवडणूक लढवण्यासाठी तयारी केले मात्र जुना गट व गणातून फक्त स्वतःचेच गाव वगळल्याने विद्यमान सदस्य नवीन गट व गणात कसं जुळवता येईल याकडे पाहत आहेत.
इंदापूर तालुक्यातील जिल्हा परिषद गट व गणनिहाय समाविष्ट गावे पुढीलप्रमाणे –
१. भिगवण-शेटफळगढे गट
भिगवण गण : भिगवण, तक्रारवाडी, डिकसळ, पोंधवडी, बंडगरवाडी, कुंभारगाव, मदनवाडी.
शेटफळगढे गण : शेटफळगढे, पिंपळे, लामजेवाडी, निरगुडे, म्हसोबाचीवाडी, लाकडी, शिंदेवाडी, निंबोडी, अकोले, वायसेवाडी, काझड.
२.पळसदेव-बिजवडी गट
पळसदेव गण : डाळज नं.१, डाळज नं.२, डाळज नं.३, पळसदेव, काळेवाडी, माळेवाडी, बांडेवाडी, न्हावी, भादलवाडी, बळपूडी, कौठळी, भावडी.
बिजवडी गण : चांडगांव, गलांडवाडी १, नरुटवाडी, वरखुटे बु., करेवाडी, लोणी देवकर,
बिजवडी, वनगळी, राजवडी, गागरगाव, पोंदकुलवाडी, गंगावळण, कळाशी, अगोती १, अगोती २, कालठण १.
३. माळवाडी-वडापुरी गट
माळवाडी गण : माळवाडी, कालठण २, माळवाडी, पिंपरी खुर्द, शिरसोडी, पडस्थळ, टाकळी, अजोती, सुगाव, शहा, सरडेवाडी, गोखळी, तरंगवाडी.
वडापूरी गण : वडापूरी, कांदलगाव, तरटगांव, हिंगणगाव, बाभूळगाव, भाटनिमगांव, वडापूरी, गलांडवाडी २, अवसरी, बेडशिंग, भांडगाव.
४. निमगांव केतकी – शेळगाव गट
निमगाव केतकी गण : निमगाव केतकी, व्याहाळी, कचरवाडी (नि.के), गोतोंडी, हगारवाडी.
शेळगांव गण : शेळगांव, कडबनवाडी, रुई, थोरातवाडी, मराडवाडी, शिरसाटवाडी, निमसाखर.
५. बोरी – वालचंदनगर गट
बोरी गण : बोरी, कळस, पिलेवाडी, गोसावीवाडी, बिरंगूडवाडी, जंक्शन, आनंदनगर, भरणेवाडी.
वालचंदनगर गण : वालचंदनगर, अंथुर्णे, रणमोडवाडी, कळंब.
६. लासुर्णे-सणसर गट
लासुर्णे गण : बेलवाडी, लासुर्णे, थोरातवाडी, जांब, बंबाडवाडी, कुरवली, चिखली, कर्दनवाडी, परीटवाडी, चव्हाणवाडी.
सणसर गण : सणसर, भवानीनगर, जाचकवस्ती, सपकळवाडी, तावशी, पवारवाडी, मानकरवाडी, उध्दट, हिंगणेवाडी, घोलपवाडी.
७. काटी – लाखेवाडी गट
काटी गण : काटी, रेडा, वरखुटे खुर्द, सराफवाडी, पिटकेश्वर, घोरपडवाडी, दगडवाडी, निरवांगी
लाखेवाडी गण : लाखेवाडी, पंधरवाडी, रेडणी, शेटफळ हवेली, भोंडणी, झगडेवाडी, जाधववाडी, खोरोची.
८. बावडा – लुमेवाडी गट
बावडा गण : बावडा, सुरवड, वकीलवस्ती, बोराटवाडी चाकाटी, पिठेवाडी.
लुमेवाडी गण : निरनिमगाव, कचरवाडी (बावडा), सराटी, लुमेवाडी, गोंदी, ओझरे, पिंपरी बु., गिरवी, टणू, नरसिंहपूर.



