Uncategorized

“रवीशेठ” म्हणजे धडाकेबाज कर्तव्यतत्परता, कृतिशील आक्रमकता, निर्णय होईपर्यंत समस्यांचा केला जाणारा पाठपुरावा.

एका संवेदनशील आणि सामाजिक भान असणा-या कृतिशील आक्रमक राजकीय नेत्या चा आज वाढदिवस आहे. अगदी कमी वयात रवी (शेठ) सरडे यांनी आपले सामाजिक भान दाखवतानाच उद्याच्या नेतृत्वाची चुणूक दाखविली आहे. वडील कर्मयोगी सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक वामनराव सरडे उर्फ तात्या यांच्या समृद्ध राजकारणाचा वारसा मिळाला असला तरी प्रतिकूल आणि अनुकूल परिस्थितीत स्वत:च्या ध्येयासाठी लढण्याची धमक आणि अस्तित्व राखण्यासाठी कष्ट करण्याची, कार्यकर्ते फक्त जोडायचेच नाहीत, तर ते टिकवण्याची शिकवणही वडिलांकडूनच मिळाली असल्याचे त्यांनी दाखवून दिले आहे.

सरडेवाडी ग्रामपंचायत सदस्य ,उपसरपंच ते कर्मयोगी शंकराव पाटील सहकारी साखर कारखान्याचे संचालक अशी एक एक पायरी चढत ते आपली राजकीय वाटचाल करत आहेत.

कर्मयोगी शंकरराव पाटील सहकारी साखर कारखान्याचे संचालक म्हणून काम करत असताना शेतकरी कामगार वर्गा विषयी त्यांचे असता नेहमी दिसून येते.जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी नेहमीच आग्रही असणा-या रवींद्र (शेठ) सरडे यांना यांना वाढदिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा..!

आपली धडाकेबाज कर्तव्यतत्परता, कृतिशील आक्रमकता, निर्णय होईपर्यंत समस्यांचा केला जाणारा पाठपुरावा, नागरी समस्यांचे निराकरण करताना त्यासाठी उपलब्ध करून दिलेले पर्याय, अशा सर्वच पातळीवर केलेले कार्य वेगळे आणि दखलपात्र ठरावे.

रवीशेठ यांना मी तसं पाहतोय ते सर्व जाती धर्मातील लोकांना सोबत घेऊन त्याच बरोबर एका संवेदनशील आणि सामाजिक भान असणा-या कृतिशील राजकीय नेत्याची आहे, याकडे दुर्लक्ष करता येणार नाही. अगदी कमी वयात यांनी आपले सामाजिक भान दाखवतानाच उद्याच्या नेतृत्वाची चुणूक दाखविली आहे. वडील वामनराव (तात्या) सरडे यांच्या समृद्ध राजकारणाचा वारसा मिळाला असला तरी प्रतिकूल आणि अनुकूल परिस्थितीत स्वत:च्या ध्येयासाठी लढण्याची धमक आणि अस्तित्व राखण्यासाठी कष्ट करण्याची, मित्र व कार्यकर्ते फक्त जोडायचेच नाहीत तर ते टिकवण्याची शिकवणही वडिलांकडूनच मिळाली असल्याचे दाखवून दिले आहे.

त्यांच्या एका हाकेला मोठ्या संख्येने युवकांचा प्रतिसाद असतो इंदापूर तालुक्याच्या पूर्व भागात जनतेने, खासकरून युवावर्गाने जणू शिक्कामोर्तबच केल्याचे स्पष्ट होत आहे. या यशामागे रवीशेठ यांनी अपार मेहनतीचा आणि एकसंध ठेवलेल्या कार्यकर्त्यांच्या फळीचा वाटा आहे.नवीन उमदं कर्तृत्वान तरुण तडफदार नेतृत्व अतिशय मनमिळाऊ आणि रुबाबदार स्वभावाने प्रेमळ आणि सर्वांचे आवडते रवीशेठ आपल्या महाविद्यलयीन जीवना पासून सर्व तरुणांनचे आवडते तुम नाही हम्म या तत्त्वावर सर्वाना एक जुटीने सोबत घेऊन चालणारे त्याना त्याच्या कार्यामुळे च सर्वांनी शेठ ही पदवी आपोआप बहाल केली आपल्या स्वभावाने आणि कार्याने त्यांनी हजरो युवकांच्या मनावर राज्य केल आपल्या संघर्षा च्या बळावर जनसपंर्क जोडलं.

आगामी काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ते जिल्हा परिषद, पंचायत समिती साठी इच्छुक आहेत. त्यांनी भागाचे प्रतिनिधित्व करावे अशी इच्छा अनेक युवकांची आहे. ती संधी त्यांना मिळेल अशी आशा सर्व तरुणांना आहे.

वाढदिवस एका….. असामान्य नेत्याचा,

वाढदिवस एका….. संच्या मित्राचा,

वाढदिवस एका….. युवकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्यांचा,

वाढदिवस एका….. विशाल अथांग सागराचा,

वाढदिवस एका…. वाघाचा,

आपल्याला जन्मदीवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा.

रवी शेठ यांना त्याच्या पुढील कार्यास खूप खूप शुभेच्छा आणि यांना दीर्घायुष्य लाभावं ही श्री चरणी सदिच्छा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button