Uncategorized

शहा येथे स्वच्छता अभियानास प्रारंभ..

विजय शिंदे

इंदापूर तालुक्यातील शहा महादेवनगर येथे ग्रामपंचायतच्या वतीने ग्रामस्थांच्या सहकार्याने स्वच्छता अभियान राबविण्यात येत आहे.या मोहिमेअंतर्गत, गावातील सार्वजनिक ठिकाणी, रस्ते, गटारे, आणि इतर परिसरांची स्वच्छता केली जात आहे तसेच, लोकांना स्वच्छतेचे महत्व पटवून देऊन, त्यांना या कामात सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित केले जाते.

शहा गावचे सरपंच दिलीप पाटील यांनी आज सकाळी जेसीबी व इतर साधनांचे पूजन करून स्वच्छता अभियानास सुरुवात केली.

यावेळी बोलताना सरपंच दिलीप पाटील म्हणाले स्वच्छ गावात, रोगराई पसरवण्याचे प्रमाण कमी होते ज्यामुळे लोकांचे आरोग्य सुधारते.कचरा व्यवस्थापन आणि योग्य विल्हेवाट लावल्याने, पर्यावरण स्वच्छ आणि सुरक्षित राहते.स्वच्छ आणि सुंदर गाव, लोकांना अधिक आनंदी आणि समाधानी जीवन जगण्यास मदत करते. गावाशेजारीच उजनी धरण असल्याने स्वच्छ गाव, पर्यटनासाठी एक आकर्षक ठिकाण बनू शकते, ज्यामुळे गावाच्या विकासाला चालना मिळेल या उद्देशाने स्वच्छता अभियानास सुरुवात केली असल्याचे ते म्हणाले.

यावेळी गावातील सर्व तरुण सहकारी, ग्रामपंचायत पदाधिकारी ग्रामसेवक व ग्रामस्थ उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button