Uncategorized

तुकोबांचे नामस्मरण करत वारकऱ्यांचे एक— एक पाऊल पंढरीच्या दिशेने.

विजय शिंदे

संत तुकाराम महाराजांचा 340 वा पालखी प्रस्थान सोहळा मोठ्या भक्ती भावात देहूनगरीत संपन्न होत आहे.अवघी देहू नगरी तुकोबांच्या नाम गजराने दुमदुमून गेलीय, टाळ -मृदुंगाच्या तालावर वारकरी ठेका धरत आहे.

महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून वारकरी पालखी प्रस्थान सोहळ्यासाठी गर्दी करत आहेत. आजपासून या सोहळ्याला सुरुवात झाली आहे. मुख्य मंदिराजवळील शिळा मंदिराच्या समोर भाविकांनी फुगडी खेळण्याचा आनंद घेतला. टाळ मृदुंगाच्या गजरात तुकोबांचे नामस्मरण केले. अभंग, ओव्या म्हणत वारकरी एक एक पाऊल पंढरीच्या दिशेने टाकत आहे. इंद्रायणी नदीमध्ये पवित्र स्नान केल्यानंतर तुकोबांच्या दर्शनासाठी वारकरी रांगेत उभे राहत आहेत.

सकाळी इंद्रायणी नदीमध्ये स्नान करून तुकाराम महाराजांचे दर्शन घेऊन या प्रस्थान सोहळयात दाखल होत आहेत.

संत तुकाराम महाराज पालखी सोहळा वेळापत्रक 2025

18 जून : प्रस्थान आणि इनामदार वाड्यात मुक्काम

19 जून :देहू निगडी आकुर्डी प्रवास व आकुर्डी मुक्काम

20 जून: आकुर्डी ते पुणे नाना पेठ मुक्काम

21 जून :निवडुंगा विठ्ठल मंदिर पुणे मुक्काम

22 जून: पुणे हडपसर लोणी काळभोर प्रवास आणि मुक्काम

23 जून :लोणी काळभोर ते यवत प्रवास व मुक्काम

24 जून :यवत वरवंड चौफुला प्रवास व मुक्काम

25 जून : वरवंड ते उंडवडी गवळ्याची प्रवास व मुक्काम

26 जून : उंडवडी गवळ्याची ते बारामती प्रवास व मुक्काम

27 जून : बारामती काटेवाडी सणसर पालखीतळ मुक्काम ( काटेवाडी येथे मेंढी बकऱ्यांचे रिंगण )

28 जून : संसर बेलवाडी, निमगाव केतकी प्रवास मुक्काम बेलवडी येथे पहिले गोल रिंगण

29 जून : निमगाव केतकी ते इंदापूर प्रवास व मुक्काम इंदापूर येथे गोल रिंगण

30 जून : इंदापूर ते सराटी पालखीतळ प्रवास आणि मुक्काम

1 जुलै : सराटी ते अकलूज प्रवास व मुक्काम निरास्मान आणि अकलूज येथे गोल रिंगण

2 जुलै : अकलूज ते बोरगाव प्रवास व मुक्काम माळीनगर येथे उभे रिंगण

3 जुलै : बोरगाव ते पिराची कुरोली प्रवास आणि मुक्काम

4 जुलै : पिराची कुरोली ते वाखरी पालखीतळ मुक्काम बाजीराव विहीर येथे उभे रिंगण

5 जुलै : वाखरी ते पंढरपूर मुक्काम वाखरी येथे उभे रिंगण

6 जुलै : एकादशी नगरप्रदक्षिणा आणि चंद्रभागा स्नान

10 जुलै : पंढरपुरातून देहूकडे परतीच्या प्रवासाला सुरुवात

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button