Uncategorized

जून महिन्यातील शेवटचा “मंगळवार”इंदापूर तालुक्यात राजकीय घडामोडींचा.?

विजय शिंदे

अनेक दशके बारामतीचे पवार कुटुंबीय व राष्ट्रवादी काँग्रेस सोबत निष्ठावंत असणारे सोनाई परिवाराचे संचालक प्रवीण माने यांनी इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती मयूरसिंह पाटील यांच्या सोबत भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतल्याची सूत्रांची माहिती आहे.

त्यांच्या पक्षप्रवेशाचा मुहूर्त जून महिन्यातील शेवटचा मंगळवार (२४ जून) असल्याची जोरदार चर्चा इंदापूर तालुक्यात रंगली आहे.

२०२४ विधानसभा निवडणुकी वेळी प्रवीण माने यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या विरोधात बंडखोरी करत विधानसभा निवडणूक लढवली होती त्यावेळी त्यांना भारतीय जनता पार्टीचे प्रोत्साहन असल्याचे बोलले जात होते, नंतरच्या काळात माने व पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती त्याचवेळी ते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे बोलले जात होते अखेर त्यांच्या प्रवेशाला मुहूर्त मिळाला असल्याची चर्चा इंदापूर तालुक्यात आहे.

प्रवीण माने यांच्या अनेक कार्यकर्त्यांनी जय श्रीराम म्हणत कमळ हाती घेण्याचा आग्रह केल्याचे सांगितले जात आहे.

प्रवीण माने यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यास इंदापूर तालुक्यात भारतीय जनता पक्षाची ताकद वाढणार असून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत त्याचा निश्चितच फायदा होणार आहे. यामुळे मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला मात्र आगामी निवडणुकीच्या दृष्टीने सावध पावले टाकावी लागणार आहेत.

यासंदर्भात भारतीय जनता पार्टीचे पुणे जिल्हा अध्यक्ष शेखर वढणे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले या संदर्भात माझ्याकडे अधिकृत माहिती नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button