प्रवीण माने यांना आमदार करण्यासाठी आज पासून तयारी सुरू; जुन्या सहकाऱ्यांनी दिल्या शुभेच्छा.

विजय शिंदे
२०२४ साली झालेल्या इंदापूर विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) मधून उमेदवारीसाठी बंडखोरी केलेल्या प्रवीण माने यांना राष्ट्रवादीचे तालुका कार्याध्यक्ष महारुद्र पाटील यांनी वाढदिवसानिमित्त २०२९ साली आमदारकी मिळावी अशा शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत.
प्रवीण माने यांचा आज वाढदिवस असून सोनाई पॅलेस या ठिकाणी तालुक्यातील सर्व कार्यकर्ते एकत्र येऊन माने यांना शुभेच्छा देत आहेत, यावेळी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे इंदापूर तालुका कार्याध्यक्ष महारुद्र पाटील यांनी सोनाई पॅलेस येथे समर्थकांसह जाऊन प्रवीण माने यांना शुभेच्छा दिल्या.
माने यांना आमदारकी मिळावी यासाठी आजपासूनच काम सुरू केले असल्याचे ते बोलले यामुळे प्रवीण माने आगामी काळात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षांशी जुळवून घेणार.? की महारुद्र पाटील गट प्रवीण माने यांच्याबरोबर भाजपसोबत जाणार अशी चर्चा आता सुरू झाली आहे.
प्रवीण माने हे विधानसभेच्या निवडणुकीनंतर भारतीय जनता पक्षाच्या वाटेवर असल्याचे बोलले जात असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे इंदापूर कार्याध्यक्ष व खासदार सुप्रिया सुळे यांचे विश्वासू सहकारी म्हणून ओळख असलेले महारुद्र पाटील यांनी दिलेल्या शुभेच्छा ने इंदापूर तालुक्यात वेगळी चर्चा सुरू झाली आहे.
काही दिवसापूर्वी प्रवीण माने यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली त्यांच्या भेटीने प्रवीण माने हे भाजपसोबत जाणार असल्याची चर्चा सुरू झाली. परंतु अद्याप प्रवीण माने यांनी या चर्चेला कोणतेही उत्तर दिले नाही,आगामी काळात माने काय निर्णय घेणार .? याकडे सर्वांचे लक्ष असेल.
उमेदवारी नाकारल्याने माने यांची बंडखोरी.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून प्रवीण माने हे इंदापूर विधानसभेसाठी इच्छुक होते,परंतु ऐनवेळी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी भाजप मधन राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केल्याने प्रवीण माने यांना उमेदवारी मिळाली नाही यामुळे माने यांनी बंडखोरी केली.
प्रवीण माने यांनी इंदापूर विधानसभा निवडणुकीत 40 हजारांच्या आसपास मतदान घेतले.



