Uncategorized

छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे मतदार हे सुज्ञ हुशार;साखरी सभासद म्हणून हिणवलं त्यांना साथ देणार नाहीत.

विजय शिंदे

साखरी सभासद म्हणून ज्यांना हिणवलं जात आहे त्यांनी एकेकाळी छत्रपती सहकारी साखर कारखान्याकडे आपली ठेव ठेवली आहे,शेअर्स भरले आहेत त्यांचे मतदानाचे हक्क रद्द करण्यासाठी पृथ्वीराज जाचक यांनी पाच वर्ष निवडणूक लांबवली. छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे मतदार हे सुज्ञ हुशार आहे, चुकीच्या लोकांना कधी साथ देणार नाहीत व छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे गतवैभव मिळवण्यासाठी श्री छत्रपती बचाव पॅनलला सर्व सभासद मदत करतील यात आमच्या मनात कोणतीही शंका नसल्याचे मत श्री छत्रपती बचाव पॅनलचे उमेदवार संग्रामसिंह निंबाळकर यांनी व्यक्त केले.

भवानीनगर येथील श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक सुरू असून प्रचार अंतिम टप्प्यात आला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री दत्तात्रय भरणे व पृथ्वीराज जाचक यांच्या नेतृत्वाखाली जय भवानी माता पॅनल उभे आहे तर माजी चेअरमन अविनाश घोलप, माजी संचालक मुरलीधर निंबाळकर व भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते तानाजी थोरात यांच्या नेतृत्वाखालील श्री छत्रपती बचाव पॅनल यांच्यात लढत होत आहे.

प्रचारादरम्यान बोलताना निंबाळकर म्हणाले श्री छत्रपती सहकारी साखर कारखाना हा पश्चिम महाराष्ट्रातील सर्वाधिक दर देणारा कारखाना म्हणून ओळख होती. परंतु आज छत्रपती सहकारी साखर कारखान्याची अवस्था बिकट झाली आहे कर्जाचा डोंगर उभा आहे. यातून कारखाना सुस्थितीत आणण्यासाठी सभासदांच्या हिताचे पॅनल आम्ही उभे केले असून आमच्या सर्व उमेदवारांना सभासद स्वीकारतील.

येणाऱ्या काळात श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याला गत वैभव प्राप्त करण्यासाठी आम्ही सर्वपक्षीय नेत्यांची मदत घेऊ, कोणतीही कामगार कपात आमच्या काळात केली जाणार नाही, कामगारांना बोनस व त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी सभासदांना उच्चंकी दर देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button