Uncategorized

त्यानंतरच्या काळात का माझ्याही पेक्षा वाढीव दर दिला नाही; अविनाश घोलप यांची पृथ्वीराज जाचक यांच्यावर टीका.

विजय शिंदे.

मी चेअरमन असताना सभासदांच्या ऊसाला २६०१ रुपयाच दर दिला, एका सभेत बोलताना पृथ्वीराज जाचक म्हणाले मी मोळी पूजना वेळी गव्हाणीत उतरलो म्हणून दर दिला, नंतरच्या काळात माझ्यावर अविश्वास ठराव मंजूर करण्यात आला त्यावेळी त्या संचालक मंडळाचे मार्गदर्शक हे पृथ्वीराज जाचकच होते त्यानंतरच्या काळात का माझ्याही पेक्षा वाढीव दर दिला नाही असा सवाल छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन व श्री छत्रपती बचाव पॅनलचे प्रमुख अविनाश घोलप यांनी केला.

छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीनिमित्त आज दिनांक ७ रोजी भवानीनगर येथे श्री छत्रपती बचाव पॅनलच्या प्रचाराचा नारळ फोडण्यात आला यावेळी घोलप बोलत होते.

यावेळी बोलताना अविनाश घोलप म्हणाले खरंतर कारखान्याची निवडणूक बिनविरोध व्हावी अशी आमची इच्छा होती, कारखाना अडचणीत आहे त्यावर काहीतरी मार्ग निघावा अशी आमची प्रमाणिक इच्छा होती, परंतु करण घोलप व देसाई साहेब तसेच अनेकांना पॅनल मध्ये घेऊ नका किंवा चर्चेला बोलवू नका असा हट्ट का धरण्यात आला.? त्यामुळे अवघ्या तीन तासात सर्व पक्ष पॅनल उभा राहिला. छत्रपती बचाव पॅनलचे जरी १५ उमेदवार असतील तरी निकालानंतर आमचे १५ व त्यांचे ६ असे एकत्रित छत्रपती कारखाना अडचणीतून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करू.

छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या परिसरातील सभासदांनी सहकार्य करून श्री छत्रपती बचाव पॅनलला संधी दिल्यास आम्ही कारखाना सुस्थितीत आणू असा दावा घोलप यांनी केला.जर पृथ्वीराज जाचक कोर्टात गेले नसते तर पाच वर्षांपूर्वी नवीन संचालक मंडळ आले असते व कारखाना सुरळीत चालला असता परंतु त्यांच्या कोर्टकचेरीमुळे कारखाना अधिक अडचणीत आला अशी टीका घोलप यांनी पृथ्वीराज जाधव यांच्यावर केली.

कुसळी सभासद, साखरी सभासद असे म्हणून हिनवले

यावेळी बोलताना उमेदवार तानाजी थोरात म्हणाले की पृथ्वीराज जाचक यांनी गेली पाच वर्षात दहा ते पंधरा हजार कारखान्याच्या सभासदांना कुसळी सभासद, साखरी सभासद असे म्हणून हिनवले आहे, त्यामुळे त्यांना सभासद म्हणून मतदानाचा अधिकार देऊ नका म्हणून पृथ्वीराज जाचक कोर्टात गेले त्याचा राग सभासद व्यक्त करतील असे मत व्यक्त केले.

त्यांना कोर्टकचेरीचा नाद..

यावेळी बोलताना मुरलीधर निंबाळकर म्हणाले की काही लोकांना कोर्टात जाण्याचा नाद असतो त्यांच्या नादामुळे आजी-माजी संचालक व अनेक सभासदांना त्रास झाला आहे.

यावेळी अविनाश मोटे, तुकाराम काळे यांनी आपली मनोगते व्यक्त केली.यावेळी परिसरातील सभासद व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button